या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७३ ) नेत्रांनीं त्याचें स्वरूप हृदयांत सांठवीतच आहे असे दिसले! मग केयूरका- ने आणलेल्या घोड्यावर बसून तो चालू लागला. तो आच्छोदसरांवरा जवळ आला, तो आपला शोध करीत आलेले आपले लोक त्याचे दृष्टीस पडले, चंद्रापीड दृष्टीस पडतांच सर्वोस आनंद झाला. मग तो वैशंपायन व पत्रलंखा व इतर लोक यांजबरोबर महाश्वेता, कादंबरी व गंधर्वलोक यांजविषयीं बोलत बसला. दुसरे दिवशीं चंद्रापीड सर्भेत बसला असतां केयूरक त्याचे दृष्टीस पडला. तेव्हां चंद्रापीडाने त्याचा सत्कार करून त्यास जवळ बसविलें व कादंबरी व महाश्वेता यांचें कुशल विचारले. तो म्हणाला, "महाश्वेतेचा आपणास असा निरोप आहे की, आपण जवळ होतां तेव्हां आपले गुण चंद्रासारखे शीतल वाटले. व तो दिवस अत्यंत आनंदाचा वाटला. तसा आणखी सुदिन यावा अशी आमची प्रार्थना आहे. " मग केयूरकानें मौक्तिकहार मार्गे राहिला होता तो तांबूलासह चंद्रापीडास अर्पण केला. मग इंद्रायुधावर बसून पत्रलेखेसह चंद्रापीड केयूरकाबरोबर गंधर्वलोकी जाऊन कादंबरीच्या मंदिरांत गेला कादंबरीचा शोध करीत तो पुष्करणीजवळ हिरव्यागार कमलिनींनी सुशोभित अशा हिमगृहांत गेला. तेव्हां त्यास हें हिमालयाचें हृदयच आहे काय असे वाटले ! त्या ठिकाणीं अंगास उटी लावून शीतोपचार पीत बसलेल्या दासींसह पुप्पशय्येवर पड लेली कादंबरी त्याच्या दृष्टीस पडली. बिरहतापाने ती बरीच अस्वस्थ दिसत होती. मग केयूकानें "चंद्रापीडाच्या प्रीतीतली दासी ही पत्रलेखा आली आहे, " असे कादंबरीस सांगितले. पत्रलेखेस पाहून तिच्या सौंदर्याबद्दल कादंबरीस मोठे आश्चर्य वाटले. मग तिनें तिला आपले जवळ बसविलें. कादंबरीची तशी अवस्था पाहून चंद्रापीड मनांत ह्मणाला, ' माझें मन फार वेर्डे आहे, अजूनहि ह्याची खात्री होत नाही. ' मग तो उघड ह्मणाला, " कोणत्या कारणानें देवीची अशी अवस्था झाली आहे ? ती पाहून मला फार वाईट वाटते!" कादंबरीस या बोलण्याचें हृद्भुत समजलें, तथापि बालस्वभावा- मुळे सलज्ज होऊन ती खाली तोंड घालून बसली. तेव्हां मदलेखा ह्मणाली, " देवीची अवस्था महाराजास सर्व सांगतच आहे, निराळे सांगावयास नको !" मग महाश्वेतेबरोबर कांहीं वेळ बोलून बराच वेळ झाल्यामुळे तो दोघींस विचारून जावयास निघाला. चंद्रापीड घोड्यावर बसत आहे तो केयूरकी कल, माज!