या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७७) भासले ! मग मी तिची प्रार्थना केली कीं, 'देवि ! रागाचा झपाटा आवर. ही मी आतां चंद्रापीडास घेऊन आलेंच समज !' याप्रमाणें आपलें नांव ऐकतांच तिनें झदिशीं डोळे उघडले व मला म्हणाली, "पत्रलेखे, खरोखरच तुजकडे पाहून मी जीवित धारण केलें आहे. तर आतां तुझ्या मनांत त्याला आणावें असे असेल तर जा लवकर. ' असे म्हणून वस्त्रभूषणें देऊन तिने मला निरोप दिला. तर महाराज देवीच्या स्नेहामुळे मला बोलल्यावांचून राहवत नाहीं. अशा देवीस महाराजांनी अंतर दिलें है दयाळूपणास अनुसरूनच केलेंना ? " असा पत्रलेखेनें दोष दिल्यामुळें चंद्रापीडास कादंबरीचें स्मरण होऊन तिच्या विरहाचे फारच दुःख वाटलें. मग तो म्हणाला, "पत्नलेखे, अशी सुंदर गंधर्वकन्या पूर्वी मी कधीं न पाहिल्यामुळे तिच्या अंगीं ह्या साहजिक शृंगारचेष्टा असतील असें वाटून मी फसलों ! पाहणें, लाजणे, वगैरे प्रकार तर असोत, परंतु चिर- काल तिच्या गळ्यांत असल्यामुळे धन्य असा हा रत्नांचा हार मज हत- भाग्याच्या गळ्यांत घालून तिनें काय बरें व्यक्त केलें नाहीं ? परंतु ही सर्व चूक दुर्दैवानें मजकडून घडवून आणविली ! तर आतां देवी मला कठोर- हृदय म्हणणार नाहीं अशाविषयीं मी यत्न करीन. " इतक्यांत एक दासी येऊन चंद्रापीडास म्हणाली, "महाराज, राणी. साहेबांनी सांगितले आहे की, पत्रलेखा आल्याचें मी ऐकिलें. याकरितां तिला बरोबर घेऊन तूं लवकर माझ्या भेटीस ये. " ते ऐकून चंद्रापीड मनांत म्हणाला, इकडे क्षणभर मी दृष्टीस पडलों नाहीं तर आईस दुःख वाटतें. तिकडे पत्रलेखेच्या मुखानें देवीचे प्रेम मला बोलावतें ! इकडे आईचे पंचप्राण माझे ठिकाण आहेत व माझे प्रियेचे ठिकाणीं आहेत ! आईबापांनां सोडून तर जाववत नाहीं, व दुष्ट मदन तर येथें चैन पडूं देत नाही ! जन्मभूमि तर सोडावीशी वाटत नाहीं व प्रियतमा तर दूर रहाविशी वाटत नाहीं ! याप्रमाणे चिंतन करीत पत्रलेखेसह तो आपल्या आईकडे गेला. तेथे विलासवतीने पुष्कळ कोडकौतुक केले व त्यामुळे त्यांस कांही बरे वाटून तो त्या दिवशी तेथेच राहिला. संध्याकाळी तो शय्येवर जाऊन निजला असतां चैन पडेना. त्याचं मन कादंबरीकडे जाऊन तिचे सौंदर्य बघण्यांत तल्लीन झाल्यामुळे त्यास दुसरे कांहीं एक दिसेनासे झाले. तिच्या मुखचन्द्रा- २३