या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८१ ) आहे ? " अर्से भाषण ऐकून चंद्रापीड मनांत ह्मणाला, " प्रियासमागमाचें चिंतन करीत असतां सहजगत्या वडिलांचेंहि भाषण त्याच विषयावर निघालें! अंधकारांत प्रवेश करणान्यावर जसा प्रकाश, किंवा मरणोन्मुखावर जशी अमृतवृष्टि तसा हा योग जमला ! तर आतां कादंबरीच्या भेटीस जाण्यास वैशंपायनाचाच कायतो उशीर आहे ! " इतक्यांत तारापीड उठला व शुकनास आणि चंद्रापीड यांसह विलासवतीच्या मंदिरांत गेला. मग तो तीस ह्मणाला, " देवि, हें पहा, बालकाचे मुखावर तारुण्यलक्षण (मिशी ) दिसत आहे. तारुण्यांतील विलास पुरविण्यास ही मूर्तिमंत आज्ञाच प्रगट झाली आहे ! सुनमुख दृष्टीस पडावें म्हणून तुला काहींच कशी घाई वाटत नाहीं ! तूं तर वरमाय ! तुला तर अगोदर हौस पाहिजे !" असे विनोदपर भाषण करीत तो कांहीं वेळ तेथें राहून भोजन करण्यास गेला. तितक्यांत चंद्रापीडानें वैशंपायनास सामोरें जाण्याकरितां पित्याची आज्ञा घेतली. त्या दिवशीं चंद्रापीड आईच्या घरींच जेवला. रात्रीं निद्रा करण्याकरितां तो गेला असतां दोन प्रहर रात्र उलटली तरी त्यास झोप आली नाहीं. पुढे चंद्रोदय होऊन जिकडे तिकडे प्रकाश पडला, तेव्हां त्याचे अंत:- करणास अधिकच उत्साह वाटला व प्रयाण सूचक वाद्ये वाजविण्यास त्यानें सांगितले. त्याबरोबर सर्व सैनिक तयार होऊन राजवाड्यापुढे येऊन उभे राहिले. चंद्रापीडहि सज्ज होऊन इंद्रायुधावर बसून त्या ठिकाणी आला. मग तो तेथून निघून व शिप्रानदी ओलांडून दशपुरास जाणाऱ्या मार्गानें घोडा फेंकीत तो चालला असतां पहाटेपर्यंत बारा कोस गेला. पुढे अरुणोदय होऊन प्रकाश पडला. पक्षी झाडांवरून उडूं लागले. श्वापदेहि रानांत पळं लागली. सूर्योदय होऊन चांगला प्रकाश पडला. तेव्हां बन्याच अंतरावर मोठे सैन्य उतरले आहे त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हां ' आतां मी एकाएकी वैशंपायनास जाऊन भेटेन, " ह्मणून त्यास मोठा आनंद होऊन व इंद्रायुधास दवडीत तो एकटाच सैन्यांचा मोठा तळ पडला होता तेथे गेला. तेथील लोक उतरण्याच्या गडबडीत होते तों तो तेथे जाऊन 'वैशंपायन कोठें आहे ? " हाणून विचारूं लागला. तेथील लोक चिंताक्रांत असून उतरण्याच्या गडबडीत असल्यामुळे चंद्रापीडास कोणीं ओळखिलें नाहीं, व “ बाबा ! येथे कोठला वैशंपायन ! " असे "