या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८५) आहे असें त्यास समजले. तेव्हां त्यांनां आपलें तोंड कसें दाखवावें, असें होऊन त्यानें खालीं तोंड घातले व शुकनासासह खवळलेल्या आपल्या पित्यास त्यानें दुरूनच नमस्कार केला. तेव्हां तारापीड ह्मणाला, वत्सा! आपल्या प्राणापेक्षां देखील तुझी वैशंपायनावर अधिक प्रीति आहे असें मी समजतों. असें असतां वैशंपायनाची अशी वृत्ति होण्यास काय कारण झाले असावें बरें ? त्यांत तुझा कांहीं दोष असावा असे मला वाटतें. " असें तारापीड बोलत असतां शुकनास संतापून ह्मणाला, “महाराज, युवराजा- कडून अशी गोष्ट कधीं होणार नाहीं. तोच कारटा मातृपितृघातकी, मित्रद्रोही व कृतघ्न पडला, त्याला चंद्रापीडानें काय करावें महाराजांनीं व देवीनें ज्याला मांडीवर खेळविलें, पुत्राप्रमाणे ज्याचें लालन पालन केलें, त्या मूर्खानें असे कसे करावें ? याचा दोष चंद्रापीडाकडे काय आहे ? चंद्रापीडा- वांचून मी कसा राहतों, महाराज मला काय ह्मणतील, आईबापांनां मी एकुलता एक, त्यांचा जीव कायतो मजवरच, इत्यादि गोष्टी त्या दुष्टाच्या, कशा लक्षांत आल्या नाहीत ? पशुपक्षी देखील उपकार जाणतात ! ते देखील मातापितरांवर प्रीति करितात ! हा लोक व परलोक गमावणांच्या कारट्यानें पहा काय केलें तें ! असला दुष्ट नीचयोनीत गेला असता तर, बरें झालें असतें ! " राजा ह्मणाला, " शुकनासा, तुझाला बोध करणे है पेटलेल्या अमीस दीपानें प्रदीप्त करण्यासारखेच आहे. विद्वान् व बहुश्रुत मनुष्य असला तरी त्याला प्रसंगी विचार राहत नाहीं. तारुण्यांत मनुष्यांकडून असे प्रमाद घडतात. तुझीं क्रोधाधीन होऊन बालकावर आग पाखडली, हैं ठीक केले नाहीं. वडिलांचे आशीर्वाद व शाप हे दोन्ही अनुभवास येतात. आपल्या हाताने झाड लाविलें असतां त्यावर देखील ममता उत्पन्न होते, मग आपल्या अपत्याविषयीं तर काय सांगाव : वैशंपायनानें असें कां केले, याचें खरें कारण आपणांस समजलं नाहीं. याकरितां त्याचेपूर्वीच त्यास दोष देणें, ठीक नाहीं. तर आतां त्यास आणण्याची तजवीज करावी ह्मणजे कायतें कळेल. " पित्यानें दोष दिल्यामुळे चंद्रापीड आपल्या मनांत फारच दुःखी झाला व शुकनासास ह्मणाला, 'माझ्या दोपामुळे वैशंपायन आला नाहीं, असें मात्र नाहीं. तथापि पित्यानेंच मजवर दोषारोप केला आहे त्या अर्थी इतर लोकहि करतीलच. यासाठी वैशंपायनास आणण्याकरितां मला वडिलांकडून परवानगी