या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८६ ) 66 66 देववावी. मजवांचून तो येणारहि नाहीं व त्याचा विरहहि मला सहन होणार नाही. आपले पत्र मला तसेंच निघून येण्याविषयीं आलें ह्मणून मी पुढे आलों. मागून तो सैन्य घेऊन येईल असे मला वाटलें. मी जन्मापासून क्षणभर तरी त्याजवांचून कधीं राहिलों आहे?" मग शुकनास तारापीडाकडे पाहून " युवराज वैशंपायनाकडे जाण्याची आज्ञा मागत आहे असें ह्मणाला. तेव्हां तारापीड सचिंत होऊन ह्मणाला, शुकनासा, चंद्र जसा चंद्रिकेनं शोभतो, तसें बधूसहित बालकास पहावें असें मनांत होतें, परंतु वर्षाऋतूप्रमाणें आशा मलिन करणारा असा हा काळ प्राप्त झाला आहे ! असो, हा गेल्यावांचून तो येणार नाहीं हें खरेंच. याकरितां चांगला मुहूर्त पाहून यास पाठविण्याचें करावें." मग त्यानें चंद्रापीडास जवळ घेतलें व त्याच्या अंगावरून हात फिरवून ह्मटलें, 'बाळा ! मनोरमेसह तुझी आई आंत आहे, तिला जाऊन भेट.' असें बोलून तो दुःखानें आपले मंदिरी गेला. मग चंद्रापीड आपले आईकडे गेला, तेथें मनोरमाबाईहि होती. तिचें सांत्वन करून तो ह्मणाला, वैशंपायनाला घेऊन येण्याविषयीं मला पित्याची आज्ञा झाली आहे; याकरितां तुमची आज्ञा मागण्याकरितां मी आलो आहे. ती झणाली, ' बाळा दूर जाण्याच्या गोष्टींनें माझें समाधान करतोस काय? तो एक आझाला सोडून गेला व तूंहि जातों ह्मणतोस, तर असे करूं नको- स, तुझ्या एकटचाच्या योगानेंच आह्मी दोघीहि पुत्रवती राहूं.' मग विला- सवती ह्मणाली, ' प्रियासखि, तूं ह्मणतेस तें खरेंच. परंतु वैशंपायना- वांचून याला तरी येथें कसें बरें राहवेल? तर याला मोडा घालू नकोस.' मग चंद्रापीड त्यांजबरोबर कांही वेळ बोलून आपले मंदिराकडे गेला. नंतर त्याने मुहूर्ताची वाट न पाहतां जाण्याची तयारी केली. नंतर तो आपल्या आईस विचारण्याकरितां गेला. त्यास पाहून विरह- दुःखानें व्याकुळ झालेली विलासवती ह्मणाली, 'बाळा पाहिल्यानें तूं गेलास तेव्हां आतांसारखे मला दुःख वाटलें नाहीं. हल्लीं माझा जीव व्याकुळ होऊन तो निघून जातो की काय असे वाटतें. कितिहि आवरतें पण रडणे आवरत नाहीं. काय माझ्या पापिणीच्या दृष्टीस पडावयाचे आहे ते समजत नाहीं. यावेळी तुझे निवारणहि मला करतां येत नाहीं; परंतु मनास तर तुला जाऊं द्यावेंसें वाटत नाहीं ! याकरितां माझी ही अवस्था मनांत आणून