या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८८ ) - 6 वाटेनें केव्हां तेथें पोहोंचेन असें चंद्रापीडास झाले होतें. त्याच्या मनांत हजारों कल्पना चालू होत्या. तो मनांत ह्मणाला “मी तेथे गेल्यावर वैशंपायनाच्या मागून जाऊन त्यास घट्ट धरीन व लज्जनें तो एकीकडे जाऊं लागला तर, आतां कोठें जातोस ?' ह्मणून त्याच्या मनांतलें वेड काढून टाकीन व त्याला ताळ्यावर आणीन. नंतर महाश्वेतेस भेटेन. मग तिला घेऊन कादंबरीकडे जाईन. मी दृष्टीस पडतांच हर्षित झालेल्या तिच्या सख्या " बाईसाहेब ! बक्षिस द्या अगोदर ! " असें ह्मणतील. " खरेंच कां येणें झालें ? किती दूर आहेत ! " अर्से उत्कंठेनें व घाईघाईनें ती विचारीत असतां मी तिच्या दृष्टीस पडेन ! मग काय विचारावें ! ती सानंद व सलज्ज होऊन पदर सांवरीत उभी राहील ! अत्यानंदामुळे तिच्या नेत्रांतून अश्रु चालल्यामुळे मदन - मीला शेवटली जलांजलिच देत आहे काय अशी ती दिसेल ! तेव्हां दर्शनीय वस्तूची परमावधि पाहिल्यामुळे मी आपल्यास कृतार्थ मानीन! महाश्वेता मग आमचा विवाहसमारंभ करील; मग देवाला हि दुर्लभ अशा सुखाचा मी उपभोग घेईन! कादंबरीचा मजवर पक्का भरंवसा बसला झणजे मदलेखे- बरोबर वैशंपायनाच्या लग्नाचा घाट जमवीन व त्यालाहि सुखांत लोटीन !" याप्रमाणे तो मनोराज्यांत गर्क होऊन मार्ग क्रमीत चालला होता. मार्गीत पर्जन्य सुरू झाल्यामुळे त्याची व त्याजबरोबरच्या लोकांची फार दुर्दशा झाली. सर्वांनां जीवन देणारा असा पर्जन्यकाळ होता तरी तो त्यास मृत्यु देणारा भासला. तथापि तो कोठें न थांबतां मोठ्या कष्टानें मार्ग क्रमीत चालला होता. परत येणारा मेघनाद त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हां त्यास तो वैशंपायनाचे वर्तमान विचारूं लागला. तो ह्मणाला, “ मला त्याविषयीं कांहीं माहिती नाहीं. अच्छोदसरोवराचे अलीकडे तीन चार मजला पत्रलेखा व केयूरक यांनी ' पर्जन्यकाळ येऊन पोहोचला आहे त्या अर्थी घरचीं माणसें महाराजास आतां येऊं देणार नाहीत, याकरतां तूं आतां येथूनच परत जा. आम्ही आतां पोहोंचल्यासारखेच आहोत.' असे मला आग्रहाने सांगितल्यामुळे मी तसाच परतलों. " हे ऐकून चंद्रापीड कष्टी होऊन पुढे तसाच मार्ग क्रमीत अच्छोदसरोवराजवळ येऊन पोहोचला. त्या वेळीं तें सरोवर गढूळ पाण्याने भरून गेलें होतें व त्यांतील कमलें नष्ट झाल्यामुळे तें विशोभित दिसत होतें. हंस व चकोरादि पक्षी त्या