या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९० ) असतात ते देखील सुर्खे भोगून धन्य होतात ! तूं जर खुशाल तप करतेस तर मग मदन कशाला धनुष्यबाण धारण करतो ? हा चंद्रहि कशाला उग वतो ! व वसंत ऋतुहि कशाला प्रकट होतो कोण जाणे !" प्रिय पुंडरीकाच्या विरहानें मी बिरक्त व दुःखी असल्यामुळे मला त्याचें असें बोलणें आवडलें नाहीं. मी तेथून उठून दुसरीकडे निघून गेलें. आणि तरलिकेस ह्मणालें ' हा तरुण ब्राह्मण कोण आहेग? याच्या बोलण्याचालण्याचा कांहीं निराळाच भाव दिसतो आहे. याकरितां तो फिरून येथें येणार नाही असे कर. नाहीं तर त्याचा नाश होईल. ' मग त्यास येथून घालवून दिलें तरी दुष्ट मदनाच्या ललेिनें अथवा होणार तें चुकत नसल्यामुळे त्यानें आपला दुराग्रह सोडला नाहीं. एके दिवशीं बरीच रात्र झाली होती, जिकडे तिकडे स्वच्छ चंद्रिका पसरली होती. मला झोंप न आल्यामुळे मी ह्याच शिळेवर येऊन बसलें होतें. प्रिय पुंडरीकाकडे लक्ष जाऊन सिद्ध पुरुषाचें भाषण कसें खोटें झालें ! असे विचार माझ्या मनांत चालू होते. अशा वेळेस तो तरुण पुरुष माझ्या आलिंगनाच्या व्यर्थ आशेने हात पसरून मजजवळ आला आणि ह्मणाला 'हे चंद्रमुखी ! मदन व त्याचा सखा हा चंद्र मला मारण्याकरितां आले आहेत, तर माझें रक्षण कर. तुझ्या स्वाधीनच काय तें माझें जीवित आहे !" अर्से त्याचें भाषण ऐकून क्रोधानें माझें देहभान नाहींसें झाले आणि हत् तुझें कपाळ फुटलें मेल्या ! तुझी वाचा बंद कां झाली नाहीं व तुझ्या जिभेचे हजारो तुकडे कां झाले नाहींत ! पशुपक्ष्याप्रमाणे कामुकपणा मात्र तूं जाणतोस, दुसरे कांहीं नाहीं ! ज्या दुष्ट दैवानें राघूपमाणें तुला बोल- ण्यास मात्र शिकविलें त्यानें तुला त्या योनींत घातलें ह्मणजे तुझ्या बोल- ण्याचा कोणाला राग तरी येणार नाही. तर आतां तुझ्या दुष्कर्माचे फळ तुला भोगावयास लावतें बघ !" अर्से ह्मणून चंद्रास हात जोडून ह्मणालें 'भगवन् ! पुंडरीकाखेरीज माझें मन दुसरीकडे कोठें गेलें नाहीं, हें खरें असेल तर हो मेल। दुष्ट शुकयोनीत जावो ! असें मी क्षणत आहे तो तो धाडकन् भूतला- वर निश्चेष्ट पडला ! तो गतप्राण होतांच त्याचे सेवक रडूं लागले व त्यांच्या बोलण्यांत आल्यावरून तो महाराजांचा मित्र होता असे समजलें !' इतके बोलून ती खाली तोंड घालून रडत बसली. ते ऐकतांच चंद्रापीड घाबरा झाला व तो तीस झणाला, ' भगवति ! तूं आपल्याकडून यत्न केलास, तथापि या पाप्यास देवीच्या समागमाचें सुख