या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९३ ) पाहिजे. तर तूं आतां जा व श्वेतकेतूस सर्व वर्तमान सांग. याच्या शरीरा- चा नाश न व्हावा ह्मणून यास मीं येथे आणून ठेविलें आहे." मग तेथून निघून मी श्वेतकेतूकडे जात असतां मार्गीत एका देवाचें अतिक्रमण केल्यामुळे तो रागावून ह्मणाला, “मूर्खा ! तूं इकडे तिकडे न पाहतां घोड्यासारखा दवडत चालला आहेस त्या अर्थी तूं अश्व होशील " तें ऐकून मी त्याची पुष्कळ प्रार्थना केली तरी “ शाप भोगल्यावांचून सुटा- वयाचा नाहीं. तथापि अश्वयोनींत तुझा व तुझ्या मित्राचा निकट संबंध राहील. उज्जयनींत तारापीड राजा पुत्राकरितां अनुष्ठानें करीत आहे, त्याचे घरी चंद्र उत्पन्न होईल. व त्याचाच प्रधान शुकनास याचे घरीं पुंडरीक जन्म घेईल व तूं चंद्रापीडाचें वाहन होशील. " मग मी लागलींच समुद्रांत पडलों व अश्व होऊन बाहेर निघालों. त्या योनीतहि मला ज्ञान राहिलें होतें. तुजवर अनुराग धरून जवळ आला असतां न समजून तूं ज्यास शाप दिलास, तो पुंडरीकाचाच अवतार होय ! " हें ऐकतांच महाश्वेतेस फारच दुःख झाले व तिनें अतिशय शोक केला. मग कपिंजल, झणाला, “तुझा यांत काय दोष आहे? शापामुळे अशा गोष्टी घडून आल्या. चंद्राची वाणी तूं ऐकिलीच आहेस, तर आतां व्यर्थ शोक करूं नकोस. " मग ती ह्मणाली, 'ऋपिंजला, पत्रलेखेची काय ‘ वाट झाली? ' तो ह्मणाल, 'सरोवरांत उडी टाकल्यावर तिच काय झालें व चंद्रापीड व वैशंपायन यांचें जन्म कोठें झालें, हें समजण्याकरितां मी आतां सर्वज्ञ श्वेतकेतृकडे जातो.' असें ह्मणून तो आकाशांत गेला. मग कादंबरी महाश्वेतेस ह्मणाली- ' देवानें तुझ्यासारखेच मला समदुःखी केले तर आतां मीं पर्दे काय करावें ?" ती ह्मणाली 'प्रियसमागमाची आशा जें करूं देईल तें करावें ! चंद्रापीड हा साक्षात् चंद्राचा अवतार आहे, याकरितां त्याची सेवा करावी मणजे तो प्रसन्न होईल. मग तिनें त्याच्या शरीराकडे लक्षपूर्वक पाहिलें तों त्यावर प्रेतकळा न दिसतां सर्वावयवांवर टवटवी व तजेला दिसूं लागला. तो तिनें सर्वोस दाखविला, तेव्हां सर्वांची खात्री झाली. मग वर्षाऋतूचे सर्व दिवस तिनं त्याजवळ राहून व सेवा करून घालविले. नंतर चंद्रापीडाबरोबरच्या राजेलोकांचे व सर्व सैनिकांचें तिनें समाधान करून सांत्वन केलें. 9 ,