या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९४ ) पुढे कादंबरीने पत्रलेखेस पाठवून आपल्या मातापितरांस घडलेला प्रकार कळवून आनंदयुक्त केलें. . तारापीड राजाकडून चंद्रापीडाच्या शोधाकरितां लोक आले, त्यांनीं तेथील सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिल्यावर मेघनादानें कादंबरीच्या संमतीनें चंद्रापाडाची बालसेवक ' त्वरितक' यास त्या लोकांबरोबर देऊन त्यास परत पाठविलें. ते उज्जयनीस येऊन पोहोंचल्यावर त्यांच्या तोंडानें चंद्रा- पीड व वैशंपायन यांचें वर्तमान ऐकून तारापीड, विलासवती, शुकनास व मनोरमा व इतर आप्तमित्र हे चंद्रापीडास पहाण्याकरितां महाश्त्रेतेच्या आश्रमीं आले. तेथें आल्यावर त्यांनी पुष्कळ शोक केला. मग चंद्रापीडाच्या जीवंत होण्याविषयीं त्यांस बरीच आशा वाटून ते तेथेच राहिले. " याप्रमाणे कथानक सांगून जाबालिऋषि ह्मणाले, 'असा कामलुब्ध पुंडरीक स्वतःच्या अविचारानें देवलोकापासून भ्रष्ट होऊन शुकनासाचा पुत्र झाला.व येथेहि पित्याच्याव महाश्वेतेच्या शापानें शुकयोनीत उत्पन्न झाला.' याप्रमाणे जाबालि बोलत असतां, मी [ राघु शुद्रकराजास ह्मणतो आहे] जागा झाल्यासारखा झालों. मागील सर्व गोष्टींचें मला स्मरण झाले. मनुष्या- प्रमाणे मला वाणी फुटली व सर्व विद्या जिव्हाग्रावर स्फुरण पावू लागल्या. जावालीच्या पुढे मला आपल्या कामुकपणाबद्दल अतिशय लाज वाटून मी आपल्या जागीं चोरट्यासारखा झालों. मग जाबालीस विनंति केली. भगवन् आपल्या कृपेनें मला ज्ञान प्राप्त झाले. पूर्वीच्या बांधवांची आठवण होऊन त्यांच्या विरहाचें मला दुःख बाटूं लागले आहे. चंद्रापीडाच्या स्मरणानें माझेहि हृदय फुटतेच की काय असे मला झाले आहे. तर चंद्रापीडा- चें जन्म कोठें झालें तें सांगावें, ह्मणजे तेथे जाऊन त्याच्या सहवासानें तही मी आपला काळ सुखांत घालवीन.' तेव्हां ते झणाले, " मूर्खा ! तूं फार उतावळा आहेस. तुला पंख फुटून तूं हिंडूं फिरूं तर लाग, मग विचार. " नंतर ते ह्मणाले ' पुरे आतां, गोष्टीच्या नादाने सर्व रात्र संपली तरी ती समजली नाहीं. आतां स्नानाची वेळ झाली आहे. ' असे ह्मणून ते उठले. मग हारीतानें मला आपल्या पर्णशाळेत नेऊन ठेवले व तोहि स्नानास गेला. तो गेल्यावर मला कृतकर्माचा मोठा पश्चात्ताप झाला. पूर्वीच्या प्रियचां- धवांचा सहवास कसा होईल व तो न झाला तर जगून तरी काय करायाचें