या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )

तला असल्याची खात्री होते. राज्यवर्धनाच्या चरित्रावरून नेहमीं सावध राहणेंच उचित आहे. तसेंच ' विद्वान् सर्वत्र पूज्यते' याचे उदाहरण, प्रकृत ग्रंथांत बाणकवि तर आहेच; परंतु याचे आणखिहि प्रसंगाने दिलेले ढळढळीत उदाहरण नैषधकर्ताी श्रीहर्ष याचें फारच ठसण्यासारखे आहे. " चित्ते बचि क्रियायांच महतामेकरूपता " याचें मूर्तिमंत उदाहरण सत्पुरुष दिवाकर मित्र याच्या व हर्षाच्या आचरणांत आढळून येण्यासारखें आहे. "उदारचरितांनां तु वसुधैव कुटुंबकम्” अशी समवृति, सत्यनिष्ठा, उपरति आणि अत्यंत दृढनिश्चय हीं बुद्धाचे चरितांत असल्यामुळे तो ' नरंका नारयण ' झालेला आहे ! इत्यादि अनेक बोधप्रद गोष्टीहि यांत आढळून येण्यासारख्या आहेत.
 ह्या निबंधाच्या वाचनानें जर वाचकांच्या मनांत ह्या कवीविषयीं अधिक आस्था उत्पन्न होऊन त्याचे ग्रंथ वाचण्याची अधिक प्रवृत्ति होईल आणि त्याच्या दुर्लभ ग्रंथांच्या शोधाचे प्रयत्न झटून सुरू राहतील व अशा प्रकारचे अन्य कवींविषयीं निबंध लिहिण्याची देशबांधवांच्या मनांत स्फूर्ति उद्भवून तसे यत्न चालू राहातील तर हा निबंध लिहिण्याची चांगलीच सार्थकता झाली, अर्से हा निबंध लिहिणारा समजेल !
 प्रस्तावनेच्या आरंभी नामनिर्देश केलेल्या विद्वज्जनांनी आपला अमोलिक वेळ खर्चून हा निबंध वाचण्याची व कांहीं ठिकाणी योग्य सूचना करण्याची तसदी घेतली याबद्दल ग्रंथकार त्यांचा फार आभारी आहे; त्यांतहि डॉ० भांडारकर व त्यांचे चिरंजीव देवदत्त रामकृष्ण भांडारकर एम्. ए. यांनीं या संबंधाची अनेक पुस्तकें देण्याची व पुष्कळ प्रसंगी वाटघाट करण्यांत आपला बहुमूल्य काळ खर्च करून साहाय्य करण्याची कृपा केली, याबद्दल ग्रंथकार त्यांचा फारच ऋणी आहे.
 तसेच रा. रा. नरसिंह चिंतामण केळकर - मराठा पत्राचे एडिटर यांनीं हा निबंध वाचून पाहून ग्रंथकारास उत्तेजन देण्याच्या कामांत तसदी घेतली, याबद्दल ग्रंथकार त्यांचाहि आभारी आहे.
 पुणें पेठ शनिवार.
मि. फा. पु. शनिवा१९१८२६ }पांडुरंग गोविंद शास्त्री पारखी.