या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुसन्या आवृत्तीची प्रस्तावना.


 ह्या पुस्तकाची प्रथमावृत्ति काढिली त्यावेळी अशा प्रकारचे हे पुस्तक वरच्या प्रतीच्या विद्वानाखरीज कोणी फारसें वाचणार नाही, तेव्हां हें खप- ण्यास बराच काळ पाहिजे व हें बहुतकरून एकजन्मीच पुस्तक होय, असे कित्ये कांनी माकीत केले होतें, परंतु ईश्वरकृपेनें तें खोटे ठरून प्रथमावृत्तीच्या सर्व ( १००० ) प्रती वर्षा दीडवर्षीतच संपल्या व त्या प्रायः हिंदुस्थानां तील सर्व भागांतून खपल्या. यावरून अशा प्रकारच्या विषयाकडे हि लोकांची अभिरुचि लागत चालली आहे असे दिसून येतें. हे खरोखरीच स्वभ षेच्या अभ्युदयाचें सुचिन्हच समजले पाहिजे. या पुस्तकाच्या संबंधानें प्रमुख वर्तमानपत्रे व मासिक पुस्तके यांनी अग्रलेख लिहून चांगले अभिमाय दिले आहेत व अनेक ठिकाणच्या मार्मिक विद्वज्जनाचेहि उत्तेजनपर अनुकूल अभिप्राय आले असल्यामुळे दुसरी आवृत्ति सुधारण्यास उमेद येऊन या पुस्तकांत ठिकठिकाणी सुधारणा करून दुसन्या आवृत्तीकरितां पुस्तक तयार केलें. प्रथमावृत्तीत प्रतिपादित विषयांच्या समर्थनार्थ आणखीहि अधिक प्रमाणे ह्या आवृत्तीत दिली आहेत. यांतील विषयासंबंधानें अनेक यूरोपियन पंडिताच्या प्रसिद्ध झालेल्या लेखांबद्दल यांत साधकबाधक प्रमाणे देऊन यथामति विवे चन केले आहे.
 या अवृत्तीत आणखी बरीच माहिती सामील केली आहे. बाणकवीच्या बरोबरची मंडळी व त्याजकडे कोणती कोणती कामे सोपविलेली होती ह्याचे वर्णन, बाणाच्या येथे वायुपुराणकथनाच्या प्रसंगानें पुराण विषयाचें विवेचन, बौद्धधर्मी अशोकराजा यांचे संक्षिप्त चरित्र, बाणाच्या वेळचे, त्याच्या अगोदरचे व नंतरचे कांही कवि आणि त्यांचे ग्रंथ, बाणपुत्राच्या नावाचा शोध, पार्वतीपरिणयासंबंधानें अधिक विवेचन; बाण व वामन बाग; कै. वि. कृ. चिपळूणकर व पंडित कृष्णपाचार्य: बाणाचे वंशजांस देवताप्रसाद; भंडीच्या संबंधानें बाण व हुएनसँग यांच्या वर्णनां- त विरोध; राज्यवर्धनानें हूणावर स्वारी केली असतां मागें हर्षाला राज्यावर बसविणाच्या खटपटोसंबंधानें बाण व हुएनसँग, स्मिथ इत्या