या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२८ ) इत्यादि अनेक मनोवृत्ति कवीनें अगदी हुबेहूब दाखविल्या आहेत ! हें प्रक रण फारच मोठे आहे. यांत शृंगार व करुण हे रस अगदीं ओथंबलेले अ- सून सरळ परंतु वजनदार व सुंदर अशा भाषेत चांगल्या रीतीनें दाखविले आहेत. यांत प्रसादगुण तर फारच चांगला साधला आहे. पूर्वजन्मीचा स्मरणाभास 'मनो हि तजन्मान्तरसंगतिज्ञम् ' हाच पुण्डरीक शापाने दुसन्या जन्मीं वैशंपायन होऊन चंद्रापीडाबरोबर ह्याच अच्छोदसरोवरावर कर्मधर्मसंयोगानें आला असतां त्यास है स्थान व महाश्वेता यांचा पूर्वपरिचितासारखा भास होऊन वेड लागल्यासारखे झालें आहे ! ह्या वेळचा प्रसंग बाणपुत्र यानें कादंबरीच्या उत्तरार्धीत असाच हृद- यद्रावक वर्णिला आहे. त्यांतील कांहीं भाग मासल्याकरितां खालीं दिला आहे. हा प्रसंग वाचला ह्मणजे ' मनो हि जन्मान्तरसंगतिज्ञम् ' ह्या महा- कवीच्या वचनाची यथार्थताच वाटते ! व ' रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्पर्युत्सुकी भवति यत्सुखितोऽपि जन्तुः । तच्चेतसा स्मरति नूनमबोध- पूर्व भावस्थिराणि जननान्तर सौहदानि ' । ह्या कविकुलगुरूच्या उक्तीचेंहि स्मरण होतें ! "अन्यस्मिन्नहन्याहतायां प्रयाणभेर्या सज्जीक्रियमाणे साधने मातरे- बास्मान् वैशंपायनोऽभ्यधात् । अतिपुण्यं ह्यच्छोदसरः पुराणे श्रूयते । तदस्मिन्स्नात्वा प्रणम्य चास्यैव तीरभाजि सिद्धायतने भगवंतं भवानीप्रभुं महेश्वरं शशांकशकलशेखरं व्रजाम: | दिव्यजनसेविता केन कदा पुनः स्वप्नेऽपि भूमिरियमालोकितेत्यभिधाय | चरणाभ्यामेवा- च्छोदसरस्तीरमयासीत् । तव चातिरम्यत्यैव सर्वतो दत्तदृष्टिः संचरन्नमरका मिनी श्रोत्र शिख रारोहणप्रणयोचितैस्तरंगानिलाहतिविलोलवृत्तिभिः किसलयैरविरल कुसुममकरंदलोभपुञ्जितानां च मत्तमधुलिहां मञ्जुना सिञ्जितरवेण दूरादाइयन्तमिव मरकतमणिश्यामया प्रभयानुलिंपन्तमित्र समं दश- दिग्भागानदत्त दिवसकरकिरणप्रवेशतया दिवाप्यन्तर्निशीथिनीमित्र विभ्राणं चिरपरिचितैरपि मेोद्धमाशङ्क्या मुहुर्मुहुरुन्मुक्त मधुर के कार वैर्वन शिखण्डिभिरुत्कन्धरैरवलोक्यमानं पदमिवजलद कालस्य प्रतिपक्ष. मिव सर्वसंतापानां निजाबासमिव जडिम्नः निर्गममार्गमित्र सुरभि मासस्य आश्रयमिव मकरध्वजस्य उत्कण्ठाविनोदस्थानमिव रते: आ. .