या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )


दिकांच्या वर्णनांत विरोहयोच्या वयासंबंधानें बाण व डॉ. हाल, स्मिथ, यांच्यांत फरक; बाणाच्या ग्रंथांतील चटकदार वाक्यांचे मासले; बाणाच्या ग्रंथावरून त्या वेळच्या रीतीभातीची वगैरे माहिती; इत्यादि प्रकरणें अधिक घातली असल्याचे आढळून येईल.
 सर्वत्र प्रमाणभूत मानलेल्या पुणे प्रांतींच्या मराठी भाषेतील शब्दोच्चारांत येत नसलले अनुखार शब्दांवर लादण्याचें मी बरेंच टाळले आहे. तसेच मराठीत येणारे संस्कृत शब्द मूळचे इस्वांत आहेत कां दीवत आहेत याबद्दल संस्कृतानभिज्ञ लोकांस शंका येऊं नये ह्मणून मीं ते जसेचे तसेच ठेवले आहेत. मराठीत येणारें " हि " हें मूळचें संस्कृतांतीलच अव्यय मराठीत आले असावें अशा समजुतीने मी ते ह्रस्वच ठेवले आहे. " त्यांनां " वगैरे चतुर्थीच्या अनेक वचनाच्या रूपांत संस्कृत षष्ठांचे अनेक वचनी " नाम् " या प्रत्ययापासूनच आला आहे, असें माझें मत असल्यामुळे मी " ना " वरचा मूळचा अनुस्वार कायम ठेवला आहे. इत्यादि कारणांनी लेखन-पद्धतींत कांही ठिकाणी मतभेद आढळून येण्यासारखा आहे.
 लक्ष्मीप्राप्तीकरितां हें पुस्तक एखादा महाराज, संस्थानिक, किंवा लक्ष्मी- पुत्र यापैकी कोणास प्रथमच अर्पण केलं असतं तर चांगला फायदा झाला असतां, अर्से बऱ्याच लोकांच्या ह्मणण्यांत आले, परंतु तसें न करितां मीं है पुस्तक सरस्वतीप्रिय पुत्रासच अर्पण केले आहे !
 शेवटी हिंदएजन्सी यांनी येथून पुढे सर्व आवृत्तीचे हक्क आपले शिरा- वर घेतले असल्यामुळे आह्मास पुस्तकें छापण्याच्या कामांतून मोकळे केले याबद्दल ग्रंथकार त्यांचा फार अभारी आहे.
 प्रकृति नीट नसल्यामुळे या ग्रंथाची मुर्फे जितक्या दक्षतेनें तपासावयास पाहिजे होतीं तशी तपासून झाली नाहींत व दोषस्थलं राहिली याबद्दल सहृदय बाचक रागावणार नाहीत अशी आशा आहे. नजरेस आलेल्या ठळक चुका शेवटी दिलेल्या शुद्धिपत्रांत दुरस्त केल्या आहेत, त्याप्रमाणे दुरस्त करून मग हा ग्रंथ वाचावा अशी सप्रेम सूचना आहे.
 पुणे पेठ शनिवार
मि. फा. शु. ९ श. १८३२.}.पांडुरंग गोविंद शास्त्री पारस्त्री.