या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाणकवीच्या पद्यांचे मासले. आतां बाणकवीच्या पद्यरचनेचा मासला पुढे दाखल केला आहे. सुभाषितशार्ङ्गधरपद्धति, जव्हणदेवाची सूक्तिमुक्तावाले व वल्लभ- देवाची सुभाषितावली या सर्वांत मिळून बाणभट्टाच्या नांवावर निरनिराळ्या रसांतली सुमारे तीस चाळीस पद्ये आढळतात. त्यांतील सात आठ पद्ये हर्ष- चरितांतलीं, तीन चार कादंबरींतली आणि दोन तीन चंडिकाशतकांतली आहेत. बाकीची त्याच्या कोणत्या ग्रंथांतली आहेत हे समजत नाहीं. यावरून त्याचे आणखी ग्रंथ असलेच पाहिजेत. असे उघड दिसतें. परंतु ते अद्याप उप- लब्ध नाहींत व पुढेंहि ते उपलब्ध होतील किंवा नाहीत, याविषयी देखील निश्च- यानें कांहींच सांगतां येत नाहीं ! बाणभट्ट हा केवळ गद्यरचनेंतच प्रवीण होता असे नाहीं, तर तो पद्यरचनेताह होता, याकरितां पुढे त्याच्या अनेक ग्रंथां- तलीं कांहीं पद्ये दिली आहेत, त्यावरून या गोष्टीची यथार्थता लक्षांत येईल. तथापि संपूर्ण ग्रंथ वाचण्यांत आला झणजे जसा त्या त्या रसांचा अनुभविक परिपाक वाचकांच्या अंतःकरणांत उतरतो, तसा मधलेच एकादें दुसरें पद्य वाचून उतरत नाहीं ! पुढील पद्यांत वाचकांस अनेक प्रसंगांतील अनेक प्रकारचे थोडे थोडे रस ग्रहण करण्यास सापडतील, व त्यामुळे बाणाच्या पद्यरचनेच्या मासल्याचा बराच आस्वाद घेण्यास सापडेल ! तशीच कवीच्या भाषाप्रवाहाची सर्वत्र सारखीच प्रौढता असते असंच केवळ ह्मणतां येणार नाहीं, हेहि लक्षांत येईल ! आणि त्याचे शृंगार, वीर करुण इत्यादि रसांवर अनेक ग्रंथ असावे अशाबद्दलहि खात्री होईल. पुढे दिलेल्या पद्यांत कांहीं कांहीं पद्ये फारच सरस असल्याबद्दल व तीं अनेक ठिकाणची असल्याबद्दल सहृदय विद्वानांच्या लक्षांत येईल. , 66 " x हरकण्ठग्रहानन्द मीलितांक्षीं नमाम्युमाम् कालकूट विपस्पर्शजात मूर्छागमामिव । x पहिली पांच पद्ये हर्षचरित्रांतील आहेत, यांतील तिसरें पद्य काव्यप्रकाशांत ममटभट्टानें स्वभावोक्ति अलंकाराचे उदाहरणाकरितां घेतले आहे,