या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्या काळच्या चालीरीती वगैरे. बाणाच्या ग्रंथांत जी त्या काळच्या रीतीभातीची वगैरे माहिती आढळते ती खाली दिली आहे:-- -- त्याकाळी जिकडे तिकडे वेदशास्त्रादिकांचीं अध्ययनें चालू होतीं व श्रौत, स्मार्त, सांख्य, योग, पुराणें, बौद्ध, जैन, पाशुपत, चार्वाक इत्यादि पंथ चालू असल्याचे आढळते. वेदाभ्यासार्ने पवित्रता येते अशी समजूत होती. कादंबरी, सरस्वती इत्यादि स्त्रियांच्या वर्णनांत भस्म, त्रिपुंड व ब्रह्म- सूत्र यांचे वर्णन आढळते. अग्निहोत्र, रुद्राक्षधारण, व मुद्राबंध, स्फटिक कुंडले यांचेंहि वर्णन आहे. संध्योपासना व तृतीयवसनावर (मोठ्यानें ) वेद- पठण करण्याची चाल होती. तिलतर्पण व पितृपिंडयज्ञ होत होतें. ग्रहण- कालीं सूतक ( विटाळ ) घरण्याची चाल होती. बौद्धधर्माचा प्रचार बराच होता. व्यायाम करून शरीर सुदृढ राखण्याची चाल होती. व्यायामशाळाहि होत्या. सरदार घोड्यावर बसून जात असतां डोक्यावर छत्र असून दोन्ही बाजूंस चवन्या वारीत सेवक धावत चालत असल्याबद्दल आढळते. स्त्रियांनां लज्जा हेच भूषण असून त्या होऊन पुरुषांशी बोलणें दांडगेपणा समजत असत ! मुलगी प्रथम गरोदर असतां तिला प्रस्तूतीकरितां माहेरीं आणीत असत. चिनीवस्त्रांची प्रसिद्धि फार होती. ती वस्त्रे सापाच्या कातीसारखी हलकी असत. यज्ञांत पुरोडाशाकरितां साव्याच्या तांदुळांचा उपयोग करीत असत. पुष्कळ ब्राह्मण श्रौतस्मार्त यज्ञायाग करणारे, निर्मत्सर व सदाचार- संपन्न असल्याचे आढळते. शिष्य गुरुगृही राहून विद्याभ्यास करीत असत. राजे व त्यांच्या सेवकांत चोळणा घालण्याचाहि प्रचार होता. सेवकांनी पत्रे कपाळावर बांधून जाण्याची व येण्याची रीत असे, व त्याप्रमाणे ती दृष्टीस पडली नाहीत तर अपघात समजत. शिवपूजन, दुग्धाभिषेक, रुद्वैकादशी बिल्वार्पण, मंत्रपूजा, संहिता, जप वगैरे असल्याचें व मंत्र, तंत्र, जारण, मारण, वशीकरण वगैरे असल्याचेंहि लक्षांत येते. स्वामीचा कोप शांत व्हावा ह्मणून खड्ग गळ्यांत बांधून जाण्याची चाल असावी असे वाटतें. बौद्ध, विप्र, संन्यासी व ब्रह्मचारी हे राजाच्या येथे व सत्पुरुषाच्या आश्रमांत बास ● "