या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४१ ) होत असे. पतिमरणापूर्वी राजस्त्रियांमध्यें विरहदुःख टाळण्याकरितां आपणांस दग्ध करून घेण्याची चाल होती. याविषयीं हर्षाच्या आईचेंच उदाहरण आहे. शोकानें हृदयताडन करण्याची रीत राजाच्या येथें दिसून येते. आनंदो- त्सवाचे वेळीं सिंदूर ( गुलाल ? ) उधळण्याची व हत्तीच्या गंडस्थळावर तो घालण्याची चाल होती. विधवा ह्या शुभ्र वस्त्रे नेसत असल्याचे आढळतें. आकाशांत संचार करण्यासारखें साधन ( विमान ) होतें. प्रयाणकालीं वेद- पठण करण्याची चाल होती. जितके कोस राजाची स्वारी जावयाची असेल तितके वेळ प्रयाणाच्या पूर्वी नौबदीवर ठोके मारण्याची चाल होती व यावरून हर्षाच्या राज्यांत कोस वगैरे समजण्याचें साधन होते असे दिसतें. प्रयाणकाली नौबत, शंख व कर्णा वाजवीत असत. सैन्यांत व्यूहरचना होती. सुभाषित पुस्तकें नजर करण्याची रीत होती. कारण ब्रह्मदेशच्या राजानें हर्षास केलेल्या नजराण्यांत सुभाषित पुस्तकें नजर केल्याचा उल्लेख आहे. बाणाच्या घरीं श्रौत, व्याकरण, तर्क (न्याय ), मीमांसा, साहित्यशास्त्र, कार्ये यांचे अभ्यास सतत चालू असल्याचे वर्णन आहे. वेद अपौरुषेय आहेत असे त्या वेळींहि मानीत असत. टोणग्याचे पाठीवर बसून गाणे गात. गुराखी गुरे राखीत असल्याचे आढळतें. मनोरथ पूर्ण व्हावे ह्मणून राजस्त्रिया स्वतः देवळें सारविण्याचें व देवास बळी देण्याकरितां स्वतः तांदूळ कांडीत असल्याचें व पुष्पमाला गुंफित असल्याचें वर्णन आहे. घोर मंत्रसाधनाकरितां व्याघ्राजिनावर बसून जप करण्याची व अनेक औषधें अंगावर धारण करण्याची चाल असे. योगपट्ट धारण करीत असत व पादुका घालीत असत. मांत्रिक प्रकार चालले असतां गुग्गुळ, धूप पेटविण्याची व पांढया मोहन्य| फेंकण्याची चाल होती. खांडस तेल लावून साफ करण्याचा, पर्वकाली व युद्धास निघते वेळीं त्याचें पूजन करण्याचा प्रघात होता. धनुष्य, बाण, खङ्ग, भाला, व हत्ती, घोडे यांचा युद्धांत उपयोग करीत असत. जुने आवळे, म्हाळुग, द्राक्षे, दाळिंबे वगैरे शोषनाशक फळे दुखणाइतास बेताने देण्याचा प्रघात होता. शोक दूर होण्याकरितां पुराणिकांनीं वगैरे उदाहरणे सांगून उपदेश करण्याची चाल होती. ब्राह्मणांनां गोप्रदानें, भूमिदानें, सुवर्णदानें बगैरे देण्याचा परिपाठ होता. मृताच्या उद्देशाने वर्खे, पात्रे, शस्त्रें, छर्ने, इ० अनेक दानें व स्यानें वापरलेल्या वस्तू देण्याची, तीर्थात अस्थि टाकण्याची व राजा वगैरे थोर पुरुषांच्या दहनस्थली चुना, पाषाण इत्यादिकांनी बांधून स्मारक करण्याची ३१