या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४२ ) चाल होती. लवकर बातमी पोहचविण्याकरितां सांडणीखाराबरोबर जरूरीची पत्रे पाठविण्याचा प्रघात होता. पाटील, कुलकर्णी होते. ओवाळून टाकण्या- ची चाल होती. शकुनावर भरवसा होता. नवस होते. आख्यानें, अख्या- यिका, इतिहास, व पुराणे यांचा उल्लेख आढळतो. राजाजवळ परंपरा- गत आलेले विद्वान्, नीतिज्ञ, व निष्कपटी असे प्रधानादिक असत. दासीच्या हातांत खड्डू असल्याचें आढळतें. “जयजयकार असो" "नजर रखो" असा ह्मणण्याचा व अवधान देण्याविषयीं सुचविण्याचा परिपाठ असे. चक्रवर्ती राजाजवळ प्रेमळ, विद्यासंपन्न, जीवास जीव देणारे, व इंगित जाणणारे मांडलिक राजे असत. इतिहास, पुराणे वाचणान्या स्त्रियाहि अस ल्याचे आढळते. स्त्रियांनीं पायांस अळता लावण्याची चाल असे. स्नान करण्याकरितां त्यावेळी पिपासारखें किंवा नौकेसारखें पात्र असल्याचें आढळतें. चांडालादिकांस स्पर्श न करण्याचा व दूर असूं देण्याचा प्रघात होता. द्रव्य व्याजी लावण्याची पद्धत होती. कस्तुरी, कापुर, केशर यांची उटी लावण्याची चाल होती. राजे लोकांत विडी ओढण्याची चाल होती ! स्त्रियांनी अगरूची व कस्तुरीची काळी टिकली लावण्याची रीत होती. राजपुरुष व स्त्रिया यांजबरोबर तांबूलाचा करंडा बाळगणारी परिचारिका असे. बिगारी धरण्याची चाल होती. चवऱ्या ढाळणें, तैलादिक लावणे, स्नान घालणे, अंग रगडणे इत्यादि कार्मे राजाच्या येथें वेश्या करीत अस क्याचे वर्णन आढळतें. देवतेस रक्ताने स्नान घालण्याचा हीनजातीत प्रघात होतासें दिसतें. 'मषीमलिनान्यक्षराणि, ' यावरून शाई होती. प्राणायाम, अघमर्षण करीत असत. विधवा भूषणे घालीत नसत. जाग- जागी अग्निहोत्रें व श्रौताचे पाठ चालू असत. शिव, सूर्य, देवी, यांच्या आराधनेचा प्रचार फार होता. विष्णु, ब्रह्मदेव, यांच्या पूजेचाहि उल्लेख आहे. चतुर्मुख शिवाचें वर्णन आढळतें. रुद्राक्षमाला, रुद्राक्षवलयें घाल. ण्याचा प्रघात होता. पुत्र पित्याची मर्यादा राखीत असत. सूर्यास रक्तचंदन व रक्तकमले व कण्हेरीची पुष्पें बाहण्याचा धार्मिक प्रघात होता. जन्मां- तराची कल्पना होती. ऋषी पांघरण्याकरितां कृष्णाजिने घेत. दैवावर मरवसा होता. गुरु, देव, व साधु यांची भक्ति केली असतां फलप्राप्ति होते अशी भावना होती. भागीरथीतीर्थयात्रा करण्याची चाल होती. पुत्राबांचून राज्यादिक निष्फळ अशी समजूत होती. स्वधर्माचरणानें