या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४३ ) 9 कल्याण होतें असा भरवसा होता. व्रतें व उपोषण करण्याचा पाठ असे, व त्यावेळी स्त्रियांनी शुभ्र पातळें नेसण्याची चाल होती. संततीकरितां अनेक मांत्रिक उपचार करण्याचीहि चाल होती. वेळ समजण्याकरितां वाळूची किंवा पाण्याची गळणारी यंत्रे होती. किंवा छाया मोजून वेळ निश्चित करीत असत. संततीकरितां अश्वत्थादिक पवित्र वृक्षांची पूजा करून, प्रदक्षिणा घालण्याची चालहि त्या वेळेपासून आतापर्यंत चालू आहे. अपूप इत्यादि पकाने व मांसादिकांचा देवतांना बळी देणें, काक- पक्ष्यांनां दध्योदनाचा बली अर्पण करणे, चवाठ्यावर बळी ठेवणे, स्वप्नांची फलें विचारणे इत्यादि अनेक चाली त्यावेळी असल्याचे वर्णन आढळून येतें. बाळंतिणीच्या गृहांत दाराच्या दोन बाजूंस कलश ठेवण्याची, त्या ठिकाणी बाहुल्या व पल्लव टांगण्याची, नांगर व मुसळ ठेवण्याची, शुभ्र पुष्पांनी मिश्रित अशा दूर्वीच्या माळा टांगण्याची व्याघ्रचर्म व घंटा टांक- ण्याची, हळदीनें पिवळें केलेले वस्त्र नेसवून षष्ठी देवीची प्रतिमा ठेवण्याची, व षष्ठीजागरण करण्याची चाल होती. हातांत शक्ति घेतलेल्या स्वामी कार्तिका- ची मूर्ति, व तांबड्या रंगांने सूर्य, चंद्र काढण्याची चाल असून तेथे सुवासिनी स्त्रिया असण्याची चाल होती. तसेच बाळंतिणीजवळ वृद्ध स्त्रिया बसून मंगलगीतें झणण्याची चाल होती. बाळंतिणीच्या दाराजवळ गंध लावलेले व पुष्पांच्या माळा घातलेले बोकड बांधून ठेवण्याची चाल होती, घृतामिश्रित सर्पाच्या काती व मेंढयांच्या शिंगांचें चूर्ण यांचा धूप करण्याची, विस्तवांत निंबाचे डाहळे जाळण्याची, ब्राह्मण शांतिपाठ झणून शांत्युदक शिंपडण्याची भिंतीवर काढलेल्या मातृदेवतांची पूजा करण्याची, व बलिदानें देण्याची, विष्णुसहस्रनामाचा एकसारखा पाठ चालू ठेवण्याची बगैरे चाली होत्या. तसेच पाय धुवून व अमिस्पर्श करून सूतिकागृहांत प्रवेश करण्याची चाल होती. मंगलकार्यात आंब्याचे व अशोकाचे पल्लव टांगण्याचा प्रचार होता. कंकोल, जायफळ, कापूर, लवंगा यांच्या माळा करून टांगण्याचा प्रचार होता. पुत्रजन्मादि आनंदाच्या वेळेस बक्षीस देण्याची व बलात्कारानें बक्षीस घेण्याची चाल असल्याचे दिसतें. षष्ठीपूजन षष्ठीपूजन व षष्ठीजागर करीत असत. मृदंग, कर्णा, शंख, चौघडा, इ० मंगलवाद्ये वाजत असल्याची चाल असे. राजपुत्राकरितां निराळें विद्यालय बांधून स्वतंत्र गुरु नेमून राजपुत्र, व गुरुपुत्र यांच्या विद्याभ्यासाची तजवीज केलेली आढळते. तेलंगी, द्रविड, r व , ,