या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४४ ) · व सिंहलद्वीपांतले लोकहि सेवेकरितां इकडे असत. वेताच्या खुर्च्यासारखी आसनें असल्याचे दिसते. ' विचित्रवर्णकंबल: ' गालिचे होते. न्यायाधि कारी, व कारकून होते. " बलभद्रमिव कादंबरीरसविशेषवर्णनाकुलम् ' यावरून त्या वेळीं या कादंबरीप्रमाणे दुसन्या कादंबन्या किंवा कथा होत्या, असे दिसतें. स्त्रियांप्रमाणें अनेक पंथो पुरुषहि एकत्र बसत असल्याचे आढळते. उन्हांत वगैरे परिश्रम केल्यानंतर कमलतंतु चोखण्याचें वर्णन आढळते. ताडाचे पंखे होते. गणपतीचाहि उल्लेख बाणाच्या दोन्ही ग्रंथांत व हर्षा- च्या ग्रंथांत आहे. महाश्वेता ब्रह्मासन व ब्रह्मसूत्र घालून अघमर्षण करीत असल्याचें वर्णन आहे. अतिथींचे पाय धुण्याची व आदरसत्कार करण्याची चाल होती. चित्रे काढण्याकरिता कुंचली असे. कारंजी असल्याचे आढळतें. वस्त्रभूषणें व तांबुल देऊन सत्कार करण्याची चाल होती. वस्त्रे भट्टींत घालीत असल्याचे आढळतें. बायकांच्या हातांत मंगलवलयें (बांगड्या ) असत. देव, ऋषि, पितर यांचें ऋण असल्याची समजूत होती. पति आला असतां स्त्रियांनी उठून उभे राहण्याची चाल होती. सूनमुख पाहण्याचे कौतुक होतें. मृत्तिका, काष्ठे, पाषाण यांच्या प्रतिमेचें पूजन होत असल्याचे आढळतें. पाणी पाजण्याकरितां पुत्र असावा अशी समजूत होती. वसंतांत ( शिमग्यांत ) बाजेवर वृद्धस्त्री व पुरुष यांचा विवाह करून थट्टा करण्याचे बगैरे बीभत्स प्रकारहि आसल्याचे आढळतें ! वीणासुकररुहव्यापारान् ' यावरून सतार, सारमंडलासारखी वाद्ये होती. गांवाला जातांना वडिलांस नमस्कार करण्याची व त्यांचा आशी- र्वाद घेण्याची, तसेच गुरू व वडील बसल्यानंतर थोडें दूर बसण्याची व आशीर्वाद सांगण्याची चाल होती. देवतांस पुष्प अर्पण करण्याची चाल होती. मंगलकार्यात सुवासिनींची गर्दी असल्याचें वर्णन आढळतें. राजांच्या येथें सुगंधि तेलांचा दीप लावण्याची व लग्न लागण्याच्या पूर्वी वधूवरां- कडून कांही गमतीचे प्रकार करविण्याचीहि चाल आढळते; या प्रसंगी आप्त- मित्रांच्या स्त्रिया मात्र असल्याचे दिसून येतें. या ठिकाणास ' कौतुकगृह असे झटले आहे. राजाच्या येथें नृत्य, गीत, वाद्यवादन, वगैरे प्रकार होते. राजाजवळ शिरोरक्षणाकरितां खड्गधारी सज्ज असे. राजा दमून आला असतां पंख्यांनी बारा घालण्याची चाल होती. आनंदोत्सवांत मद्याने धुंद होऊन चांभार जोरानें नगारे वाजवीत असल्याचे आढळते. दौंडी पिटबि- 6 ,