या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषया पुस्तके जपून वापरा ( २४५ ) ण्याचा प्रघात होता. मोहोर बंद करण्याचें माहित होतें. हत्तींच्या कानांवर शंखांच्या माळा भूषणासारख्या घालीत असत. कार्यात श्रीफलें घेऊन जाण्याचा प्रघात होता. जाणत्या मुलांनां निजविण्याच्या वेळेस वृद्ध स्त्रिया गोष्टी सांगत असल्याचा प्रचार होता. लोहचुंबकाची माहिती होती. दोन पाय, दोन गुडघे व मस्तक अशा पंचांगांनी नमस्कार करण्याचा प्रघात होता. संहिता, पर्दे, क्रम ह्मणण्याचा पाठ होता. क्षयकालीं बारा सूर्य उगवत असल्याचें वर्णन आढळते. महानवमी ( आश्वीन शु० ९ ) च्या दिवशीं टोणगे मारण्याची चाल असावी. व ती दशनीस ह्मणजे दसऱ्याच्या दिवशीं चालू झाली असे दिसतें. वाघ धरण्याकरितां सापळे होते. मोरांच्या पिसांची छत्री असल्याचे आढळतें. गुरू, देव, साधू यांचें आराधन केले मनोरथ पूर्ण होतात अशी समसूत होती. हस्तिदंती राजमंदिरें वर्णन आहे. स्त्रियांच्या गालावर वेलबुट्टी काढीत असत. राजांच्या येथें कुब्ज बामन षंढ हे नौकर असल्याबद्दल, अनेक पशुपक्षी संग्रहास असल्याबद्दल, तर्सेच गंधी तांबोळी हे संग्रहास असल्याबद्दल आढळते. त्यावेळी भगवद्गीता महा- भारतांत असल्याचा उल्लेख आढळतो. परकीय लोक काष्ठ तोडण्याकरितां आले असतां कुन्हाडी हिसकून घेण्याची आणि खांद्यावर कुन्हाडी टाकून न्याहारी बांधून रानांत जाण्याची चाल होती. दुखणे जाण्याकरितां दानधर्म करण्याचा प्रघात होता. प्रयाणकाली व दिवसवेळा दाखविण्याकरितां शंखनाद करण्याचा प्रचार होता. शिकी टांगून त्यांवर पदार्थ ठेवण्याची चाल होती. रहाटगाडगें होतें. पुत्रजन्मोत्सवाच्या वेळीं बंदिवानांस सोडण्याची, बाळंत विडे नेण्याची व मंत्रघोषाने भूतबाधा घालविण्याची चाल होती. दुखणाइता- करितां पाणी कढवून सच्छिद्रपात्रांतून गाळीत असल्याचे आढळते. पती- समोर - विशेषकरून लग्मांत-वधूनें खाली मान घालून बसण्याचें व वस्त्राने तोंड झाकण्याचे आढळतें. उपाध्याय शांत्युदक शिंपडीत असल्यानें, जावयाचा आदरसत्कार करीत असल्याचें, बोहल्यावर सुपांत शमी, समिधा, लाह्या, दर्भ, ठेवीत असल्याचे आढळते. वधूवरांच्या शयन- मंदि- रांत मंगलदीप, अशोकवृक्ष, व त्याखाली धनुष्यबाण धारण करणारा मदन काढीत असत. आचमन करून दानधर्म करण्याची चाल होती. दुखणा- इताच्या खोलीची दारें बंद करण्याची चाल होती. हरिणांनी भ्यावें, ह्मणून तृणादिकांचे पुरुष करून शेतांत बसवीत असल्याचे आढळते. राजेलोक · असतां असल्याचें