या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बाणभट्ट.
" प्रागल्भ्यमधिक्रमाप्तुं वाणी बाणो बभूवेति ! "


गोवर्धन.


बाणाचे पूर्वजादिक, त्यास झालेला पितृवियोग


व त्याचे वसतिस्थान.


 बाणकवि हा भार्गववंशांत उत्पन्न झाला. याच परमपूज्य वंशांत च्यवन, दधीच, सारस्वत इत्यादि तपोधन उत्पन्न झाले. साक्षात् सरस्वतीपासून सार- स्वत हा झाला, अर्से हर्षचरितांत म्हटले आहे. सारस्वताचा चुलतबंधु वत्स यापासून अविच्छिन्न संतति चालत आल्यामुळे या वंशास 'वात्स्यायन' असे नांव पडलें. ह्या वंशांत बरेच महर्षि व विद्वान् उत्पन्न झाले. बाणाचा निपणजा कुबेरै.

 १ अधिक प्रौढता येण्याकरितां वाणी ( सरस्वती ) बाणरूपानें झाली ! सरस्वती स्त्री असल्यामुळे तिच्यांत प्रौढता नव्हती, ती येण्याकरितां ती बाण ( पुरुष ) रूपानें उत्पन्न झाली ! ( संस्कृतांत अर्थचमत्काराकरितां ब आणि व एकच मानतात. )  २ महाभारतांत पुढीलप्रमाणे मूळचीं चारच गोत्रे सांगितली आहेत.

मूलगोत्राणि चत्वारि समुत्पन्नानि भारत


अंगिराः कश्यपश्चैव वसिष्ठो भृगुरेवच । '


शांतिपर्व, अध्याय २९६, श्लोक १७.


 ३ बाणाचे पूर्वज, त्यास झालेला पितृवियोग, व त्याचें बालपणाचें स्वच्छन्दाचरण इत्यादिविषयीं हर्षचरितांत असलेला आधारः-
 'एवमतिकामति काले प्रसवपरम्परा भिरनवरतमापतति विकाशिनि वात्स्यायनकुले, क्रमेण कुबेरनामा वैनतेय इव गुरुपक्षपाती द्विजो जन्म लेभे । तस्याभवन्नच्युतः ईशानो हरः पाशुपतश्चेति चत्वारो युगारम्भा इव ब्रह्मतेजोजन्यमानप्रजाविस्तारा नारायणबाहुदण्डा इव सच्चक्रनन्दकास्तनयाः । तत्र पाशुपतस्यैक एवाभवद्भूभार इयाचलकुलस्थितिश्चतुरुदधिगम्भीरोऽर्थपतिरिति नाम्ना समग्राग्रयजन्मचक्रचूडामणि - महात्मा सूनुः । सोऽजनयद्भृगुं हंसं शुचि कविं महीदत्तं धर्म जातवेदसं चित्रभानुं त्र्यक्षमहिदत्तं विश्वरूपं चेत्येकादश रुद्रानिव सोमामृतरसशीकरच्छुरितमुखान्पवित्रान्पुत्रा-

( पुढें चालू )