या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)


याला अच्युत, ईशान, हर आणि पाशुपत असे चार पुत्र झाले. यांपैकी पाशुपत हा बाणाचा पणजा. याचा पुत्र अर्थपति. याला भृगु, हंस, शुचि, कवि, महीदत्त, धर्म, जातवेदस्, चित्रभानु, त्र्यक्ष, अहिदत्त, आणि विश्वरूप असे अकरा पुत्र झाले. बाणाचे हे सर्व पूर्वज व चुलतबंधु यज्ञयागादि कर्मे करणारे मोठे कर्मठ, सर्व शास्त्रांची तत्त्वें जाणणारे, महाज्ञाते, निर्वैर व शांत असल्याबद्दल त्यानें बन्याच ठिकाणी उल्लेख केला आहे. चित्र- भानूस बाण हा पुत्र झाला. बाणाच्या आईचें नांव राज्यदेवी असें होतें. बाणा- स गणपति, अधिपति, तारापति व श्यामल असे चार चुलतंबंधु होते. आणखी त्यास चंद्रसेन व मातृषेण असे पारशव (दासीपुत्र) बंधु होते. बाणाची आई तो अगदर्दी लहान असतांच वारली! तेव्हां त्यांचे बापास आईप्रमाणे आपल्या मुलाचें संगोपन करावे लागले. बाणाचें उपनयन व वेदाध्ययन झाल्यावर त्याचे वयाचे चवदावे वर्षी त्याचा बापहि मरण पावला! तेव्हां त्यास फारच दुःख झाले व त्यामुळे त्याचें हृदय अगदीं जळत राहिलें! पितृमरणाचें दुःख त्यानें कादं-

[ मागील पृष्ठावरून पुढे चालू ]


न् । अलभतच चित्रभानुस्तेषां मध्ये राजदेव्यभिधानायां ब्राह्मण्यां बाणमात्मजम् । स बाल एव विधेर्बलवतो वशादुपसंपन्नया व्ययुज्यत जनन्या । जातस्नेहस्तु नितरां पितै- वास्य मातृतामकरोत् । अवर्धत च तेनाधिकतरमेधीयमानधृतिर्धाम्नि निजे ।
कृतोपनयनादिक्रियाकलापस्य समावृत्तस्य चतुर्दशवर्षदेशीयस्य पितापि श्रुतिस्मृतिवि- हितं कृत्वा द्विजजनोचितं निखिलं पुण्यजातं कालेनादशमीस्थ एवास्तमगात् । संस्थिते च पितरि महता शोकेनाभीलमनुप्राप्तो दिवानिशं दह्यमानहृदयः कथंकथमपि कति- पयान्दिवसानात्मगृह एवानैषीत् | गते च विरलतां शोके शनैः शनैरविनुयनिदानतया स्वातन्त्र्यस्य, कुतूहलवहलतया च बालभावस्य, धैर्यप्रतिपक्षतया च यौवनारम्भस्य, शैशवोचितान्यनेकानि चापलान्याचरन्नित्वरो बभूव ।'
 १ कादंबरीत पाशुपत या नांवाचा मुदलींच उल्लेख नाहीं ! त्यामुळे कुबेराचा पुत्र अर्थपति असा भलताच अर्थाचा अनर्थ होतो. तेव्हां यासंबंधाचें पद्य तेथें चुकून राहिले असावें. संस्कृतगुरूंच्या [ प्रोफेसरांच्या ] हातून कादंबरीच्या इतक्या आवृत्ति निघाल्या असून अशी चूक कशी राहिली तें समजत नाहीं !
 २ ' पितृव्यपुत्राः ' असा सामान्य निर्देश आहे.  ३ स बाल एव विधेर्बलवतो वशादुपसंपन्नया व्ययुज्यत जनन्या । जातस्नेहस्तु नितरां पितैवास्य मातृतामकरोत् ।'
 ४ ' संस्थितेच पितरि महता शोकेनाभीलमनुप्राप्तो दिवानिशं दह्यमानहृदयः कथं- कथमपि कतिपयान् दिवसानात्मगृह एवानैषीत् ।