या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६)


ज्याला शत्रु व मित्र नाहीत, असा जगांत कोण आहे? महाराजाकडे तरी याचा काय बोल आहे? आह्मीं या गोष्टींची पक्की चौकशी केली व तुमच्या- साठी राजाधिराजाजवळ विनंति करून त्यांच्या मनांतला किंतू काढून टाक ला. पूर्ववयांत सर्वांकडून कांहीं प्रमाद घडतात, ही गोष्ट महाराजांसहि मान्य आहे, तर आतां कालक्षेप न करतां राजदर्शनास येण्याचें करावें. राजाधि राजाचें दर्शन न घेतां निष्फल ( वांझ ) वृक्षाप्रमाणे आपल्या घरी बंधुजनांत व्यर्थ काल घालविणे मला प्रशस्त वाटत नाहीं. परवशतेबद्दल किंवा राजाधि राजाजवळ गेलों असतां कसे होईल? याबद्दल काळजी बाळगण्याचें कांहीं कारण नाहीं. राजसेवा कठिन तर खरीच कारण, 'राजसेवा मनुष्याणामसि- धारावलेहनम् | पञ्चाननपरिष्वंगो व्यालीवदनचुम्बनम् ।' असें राजसेवा कठिन असल्याचे वर्णन आहे खरें ! तथापि ते राजे निराळे ! ह्या राजाची सर कोणाला येणार आहे? पदरीं पुष्कळे पुण्य असल्याखेरीज ह्या राजाचा सौख्यकारक आश्रय कोणाला मिळणार आहे ?
 पत्र घेऊन आलेल्या दूतास बाणानें 'भद्रमशेषभुवननिष्कारणबंधो- स्तत्रभवतः कृष्णस्य ' असे ह्मणून निष्कारणबंधु कृष्णराजाचें कुशल विचारलें आहे व त्या सज्जनास उद्देशूनच:-

“ अतिगंभीरे भूपे कूप इव जनस्य निरवतारस्य ।
दधति समीहितसिद्धिं गुणवन्तः पार्थिवा घटकाः ॥ "
“ रागिणि नलिने लक्ष्मी दिवसो निदधाति दिनकरप्रभवाम् ।
अनपेक्षितगुणदोषः परोपकारः सतां व्यसनम् ॥ "

 ' ज्याच्यांत उतरण्यास पाय-या नाहीत अशा खोल व गंभीर कूपांत मनुष्याला उदक प्राप्त करून देण्यास गुण ( दोरी ) लावलेले घट जसे साधक आहेत; तसे थोर राजापर्यंत जाऊन पोहोचण्यास ज्यांना मार्ग नाहीं, अशा लोकांचें इच्छित कार्य गुणवान् राजपुरुष हे घडवून आणतात ! '
 ' जसा दिवस सूर्योदयानें प्रकट झालेली लक्ष्मी कमलाचें ठायीं अर्पण करतो, त्याप्रमाणे गुणदोषांकडे लक्ष न देतां परोपकार करणे सज्जनाचें


 १“ नास्याल्पपुण्यैरवाप्येत सर्वातिशायिमुखरसप्रसूतिः पादपल्लवच्छाया "
 २ सज्जनाच्या संबंधानें 'प्रायेणाकारणमित्राण्यतिकरुणार्द्राणिच सदा खलु भवन्ति सतां चेतासि! ' अर्से कादंबरीतहि बाणानें हारित ऋषीच्या संबंधानें शुकशावकाच्या मुखांत घातले आहे.