या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९ )


राजत्वम्' 'देवत्वाहून अधिक राजपण !' वर्णिले आहे. मंग द्वारपालाने बाणकवि आल्याचें राजास कळविलें. तेव्हां ' हाच काय तो असें हर्पराजानें ह्मटले. यावर ' हेच ते महाराज ' असे त्यानें सांगितले...
 हर्षाचा बंधु कृष्णराज त्याने आपल्याकडून राजाच्या मनांतला वाईट ग्रह काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता, तरी बाणाची भेट झाल्यावर हर्षराजा हा आपल्याजवळ बसी मालवराजपुत्राजवळ क्रोधमुद्रेनें 'हा मोठा दुर्वृत्त आहे!" असें वाणास लक्षून बोलला. तें ऐकून बाणानेंहि राजाची भीड न धरतां झटलें, 'राजा अज्ञानासारखें व कांहीएक लोकचरित माहीत नसल्यासारखे काय बोलतोस? लोक चमत्कारिक असतात; ते पाहिजे तें बोलतात, परंतु थोरांनी यथार्थ असेल तेंच लक्षांत घेतले पाहिजे. ह्या असल्या भाषणानें मला फारच वाईट वाटतें. मी कोणी असा तसा नव्हे! सर्वल प्रसिद्ध व अतिपवित्र अशा वात्स्यायनकुलांत जन्मलों. यथाकालीं माझे सर्व


[ मागील पृष्ठावरून पुढे चालू ]


निष्फलाः सन्निधिलाभाः । न जिनस्येवार्थवादशून्यानि दर्शनानि । न चंद्रमस इव बहुलदोपोपहताः श्रियः । 'चित्रमिदमत्यमरं राजत्वम् ' ।
 अपिचास्य त्यागस्यार्थिनः, प्रज्ञायाः शास्त्राणि, कवित्वस्य वाचः, सत्वस्य साहस स्थानानि, उत्साहस्य व्यापाराः कीर्तेर्दिङ्मुखानि, अनुरागस्य लोकहृदयानि, गुण- गणस्य संख्या, कौशलस्य कलाः न पर्याप्तो विषयः । '
 १ ' महानयं भुजंग: ' असें हर्षानें हाटलें. यावर बाणकवीनें ' का मे भुजंगता असें खुबीनें उत्तर दिलें. ह्मणजे कोणता माझा दुर्वृत्तपणा ? किंवा 'का मे भुजं गता' कोणती ( स्त्री ) माझ्या हाती आली? किंवा 'कामे भुजंगता' हाणजे मदनाचे ठायीं भुजंगता हाणजे दुर्वृत्तपणा आहे माझे ठायीं नाहीं! असे खुबीनें श्लेषचमत्कार केले.
 २ देवअविज्ञातत्व इव अश्रद्धधान इव नेय इव अविदितलोकवृतान्त इव कस्मादेव- माज्ञापयसि | स्वैरिणो विचित्राश्च लोकस्य स्वभावाः प्रवादाश्च । महाद्भिस्तु ययार्थदर्शिभि- र्भवितव्यम् । नार्हसि मामन्यथा संभावयितुमविशिष्टमिव ब्राह्मणोऽस्मि जातः सोमपाथिनां वंशे वात्स्यायनानाम् । यथाकालमुपनयनादयः कृताः संस्कराः । सम्यक्षठितः सांगो वेदः। श्रुतानि यथाशक्ति शास्त्राणि।दारपरिग्रहादभ्यागारिकोस्मि । का मे भुजंगता ? लोकद्वयाविरो- धिभिस्तुचापलै: शैशवमशून्यमासीत् अत्रानपलापोस्मि अनेनैवच गृहीतविप्रतीसारमिव मे हृदयम् । इदानीं तु सुगत इव शान्तमनसि मनाविव कर्तरि वर्णाश्रमव्यवस्थानां सम- वर्तिनीव च साक्षाद्दण्डभृति देवे शासति सप्ताम्बुराशिरशनामशेषद्वीपमालिनीं महीं क इवाविशङ्कः सर्वव्यसनबन्धोरविनयस्य मनसाप्यभिनयं कल्पयिष्यति ।