या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १० )


संस्कार होऊन मीं उपनयनानंतर सांग वेदोध्ययन व शास्त्राध्ययन केलें आहे. माझा विवाह होऊन मी गृहस्थाश्रमी झालों आहे. इहलोक व परलोक याला घातक असे मजकडून कांहीं एक वर्तन घडले नाहीं. यांत मी कांहीं एक छपवीत नाहीं. सांप्रत बुद्धासारखा शांत, मनूसारखा वर्णाश्रमांची व्यवस्था करणारा, व यमधर्मासारखा तूं शास्ता असतां भलत्यासलत्या गोष्टी करण्याविषयीं कोणाच्या मनांत तरी येणार आहे? फार काय सांगावें? पशुपक्षी देखील तुला भिऊन वागतात, मग मनुष्याची काय कथा? आतां मी कसा आहे ते सह- वासाने कळून येईल! यावर ' आह्मी असे ऐकिलें ह्मणून हाटलें!' असे बोलून हर्षानें वाणोचा सन्मान न करता केवळ प्रसन्नतेचें मात्र चिन्ह दाखविलें व तो उठून गेला. वाणकवीच्या अशा भाषणानें हर्षास राग आला नाहीं यावरून

" पुरुषाः सुलभा लोके सततं प्रियवादिनः ।


अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभः


 ' गोड बोलणारे पुष्कळ असतात, परंतु अप्रिय व हितकर बोलणारा व ऐकणाराहि विरळा. ' ह्या आद्यकवीच्या वचनाचें स्मरण होऊन वक्ता व श्रोता हे दोघेहि स्तुतीस पात्र आहेत, असें लक्षांत आल्यावांचून रहात नाही. ह्या वेळी हर्षराजानें वाणकवीचा सन्मान जरी केला नाहीं, तरी किंचित् प्रसन्न मुद्रेनें आपलें प्रेम व्यक्त केलेच.
 संध्याकाळी वाण आपल्या बिन्हाडी जाण्यास निघाला तेव्हां त्यांच्या


 १ सांगवेदाव्यनाचे मोठें फल सांगितले आहे:--
तस्मात्सांगमधीत्यैव ब्रह्मलोके महीयते ' सायणकृतोपोद्धात.
 २ भूपतिरपि ' एवमस्माभिः श्रुतम् ' इत्यभिधाय तूष्णीमेवाभवत् ।
 ३“ अकरोच्च चेतस्यतिदक्षिणः खलु देवो हर्षः | यदेवमनेकबालचरितचापलो- चितकालिनकोपितोऽपि मनसा स्निह्यत्येव मयि । यद्यहमक्षिगतः स्यां न मे दर्शनेन प्रसादं कुर्यात् इच्छति तु मां गुणवन्तं । उपदिशन्ति हि विनयमनुरूपप्रतिपत्युपपाद- नेन वाचा विनापि भर्तव्यानां स्वामिनः | अपिच धिङ्मां स्वदोषान्धमानसमनादर- पीडितमेवमतिगुणवति राजन्यन्यथा चान्यथाच चिन्तयन्तम् । सर्वथा करोमि तथा, यथा, यथावस्थितं जानाति मामयं कालेन । इत्येवमवधार्य चापरेर्निष्कृय कटका- मुहृदां बांधवानां च भवनेषु तावदतिष्ठत् | यावदस्य स्वयमेव गृहीतस्वभावः पृथिवी- पति: प्रसादवानभूत् । अविशच्च पुनरपि नरपतिभवनम् । स्वल्पैरेव चाहोभिः परमप्रीतेन प्रसादजन्मनो मानस्य प्रेम्णो विश्रम्भस्य द्रविणस्य नर्मणः प्रभावस्य च परां कोटिमानीयत नरेन्द्रेणेति । "