या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )


तो सिंहासनावर बसल्यावर वंशवाद्ये वाजविणारे मधुकर व पारावत त्याज- वळ येऊन बसले. मग सुदृष्टीनें सूत्रवेष्टन काढून व्यासपीठावर वायुपुराणाचें पुस्तक ठेवल्यावर सकाळी संहिता वाचल्याची खूण काढून गायनपूर्वक वायुपुराण सांगितलें व हर्षचरितासारखे वायुपुराण असल्याचे वर्णन केलें.


[ मानील पृष्ठावरून पुढे चालू ]


पत्रमुत्क्षिप्य गृहीत्वाच कतिपयपत्रलध्वीं कपाटिकां क्षालयन्निव मषीमलिमान्यक्षराणि दंतकांतिभिरर्चयन्निव सितकुसुमसूक्तिभिग्रंथं मुखसन्निहित सरस्वती नू पुरवैरिव गमकै मधुरैराक्षिपन्मनांसि श्रोतॄणां गीत्या पवमानप्रोक्तं पुराणं पपाठ ।'
 १ वायुपुराणाचा उल्लेख महाभारतांतहि आढळतो.

' एतत्ते सर्वमाख्यातमतीतानागतं तथा ।


वायुप्रोक्तमनुस्मृत्य पुराणमृषिसंस्तुतम् ॥'


म० भा० वनपर्व, अध्याय १९१ श्लोक १६


 आमचे पुराणग्रंथ इसवी सनाच्या एक हजार वर्षापुढचे आहेत, असें वुइल्सन- प्रभृति युरोपिअन पंडितांनीं ठरविलें होतें. परंतु बाणकवीच्या हर्षचरिताची माहिती त्यांना झाल्यावर हें त्यांचें वेड दूर झालें! आमचीं पुराणेंचशीं काय, जितक्या ह्मणून आमच्या जुन्या गोष्टी आहेत, तितक्या आलीकडच्या ठरतील तितक्या ठरविण्याची युरोपिअनांनां मोठी हौस वाटते. जेव्हां एकादा सबळ पुरावा सापडतो, व तो ना- कारतां येत नाहीं, तेव्हां कोणतीहि गोष्ट प्राचीन असल्याबद्दल कबूल करणें त्यांनां भाग पडतें ! पुराणासंबंधानें असेंच झालें होतें. बाणाच्या हर्षचरिताची माहिती जेव्हां त्यांनां झाली, तेव्हां इ० स०च्या सहाशे वर्षापूर्वीचे पुराण ग्रंथ आहेत असें ते ह्मणूं लागले! नाहींतर विष्णुपुराण हें इ०स०१०४५त रचिलें असावें असें उइल्सन साहेबासारख्यांनीं अगर्दी पक्का कालनिर्णय ठरवून टाकला होता ! ह्या साहेबांस पुराणांतील कित्येक शब्दांचे अर्थ न कळल्यामुळे त्यांनीं भलभलतेच अर्थाचे अनर्थ केलेले आहेत !
 डा. फुल्लर, व्हिन्सेंटस्मिथ# वगैरे युरोपिअनांनी बाणाच्या ग्रंथावरून व त्यांतील संदर्भावरून वायु, विष्णु, अग्नि, मार्केडेय, इ. पुराणें बाणास माहीत होतीं असें आतां कबूल केले आहे. वायुपुराणाचें वाचन व कथन तर बाणाच्या येथे त्या वेळीं चालू असल्याचा स्पष्ट पुरावाच आहे.


  • The most systmatic record of Indian historical tradition

is that preserved in the dynastic lists of the Puranas. Five out of the eighteen-works of this elass, namely, the Vayu, Matsya, Vishnu, Brahmanda,and Bhagavat, contain such

( पुढे चालू )