या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साहेब गेल्या होत्या, तेथें महाभारताचें पुराण चाललें होतें, त्यांत निपुत्रिका ला सद्गति मिळत नाही, असा कथाभाग निघाला होता. तो ऐकल्या पासून बाईसाहेब फारच कष्टी झाल्या आहेत. त्यांस आपलें जिणें व्यर्थ वाटत आहे. त्या कांहींएक खात नाहींत पीत नाहींत, अंगावर दागदागिने घालीत नाहींत, किती समजूत केली तरी उत्तर देत नाहींत, त्या एकसारख्या रडत बसल्या आहेत, याला काय करावें? " इत्यादि वर्णन आहे. यावरून बाण कालाच्याहि पूर्वीपासून पुराण ग्रंथ व त्यांचें कथन व श्रवण चालू असल्याचें कोणाच्याहि लक्षांत येण्यासारखे आहे.

हर्षचरितांतील मुद्याचा मजकूर.

 बाणाच्या आप्तांनीं र्हषचरित सांगण्याविषयीं बाणाचा घाकटा चुलत भाऊ श्यामल यास खुणावलें. तेव्हां तो बाणास ह्मणाला 'हर्षराजानें पुष्कळ राजांस जिंकून त्यांचें कांहीं चालू दिले नाहीं; तेव्हां अशा महापराक्रमी राज- चरित्र सांगून हा आपला भार्गववंश अत्यंत पवित्र करावा. ' यावर वाण ह्मणाला, " स्वार्थदृष्टि असतात त्यांच्या ध्यानांत शक्याशक्य गोष्टींचा विचार येत नसतो ! हर्षचरित केवढ़ें तरी मोठें आहे! ते सर्व सांगणें मजकडून अशक्य आहे. तथापि तुमच्या आग्रहावरून यथामति सांगेन ! आज आतां संध्याकाल झाला आहे. " असे बोलून वाण शोणनदीवर सायं. संध्येस गेला. दुसरे दिवशीं प्रातःसंध्यादिकमें आटोपल्यावर सर्व मंडळी त्याजवळ येऊन बसली. तेव्हां त्यानें हर्षचरित सांगण्यास आरंभ केला.  हर्षाच्या ताम्रपत्रलेखांत हर्षचरितांत नसलेल्या त्याच्या बन्याच पूर्व- जांचा नामनिर्देश केलेला आहे, याकरितां तो ताम्रपत्रलेख या ठिकाणी देणें आवश्यक वाटल्यावरून तो पुढे दिला आहे.

वंस्खेड येथील ताम्रपत्रलेख.

 'एपिग्राफिया इंडिका' (Vol.IV.September 1896 ) यांत हर्षानें दिलेल्या अग्रहाराबद्दल दोन हि ताम्रपत्र लेख छापले आहेत, त्यांपैकी हा एक होय.



[ मागील पृष्ठावरून पुढे चालू. ]

इति । तच्छ्रुत्वा भवनमागत्य परिजनेन सशिरःप्रणाममभ्यर्थ्यमानापि नाहारमभि- नन्दति न भूषणपरिग्रहमाचरति नोत्तरं प्रतिपद्यते केवलमविरलबाप्पविन्दुदुर्दिनान्ध- कारितमुखी रोदिति । एतदाकर्ण्य देवः प्रमाणम् । इत्यभिधाय विरराम ।'