या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४ ) इतर पुरुष यांचाहि बराच इतिहास सांपडतो. बाणाचे ग्रंथांत जितकें ऐतिहासिक वृत्त सांपडतें, तितकें देखील ( राजतरंगिणीखेरीज ) इतर संस्कृत कवींच्या ग्रंथांतून सांपडत नाही. तेव्हां या संबंधानें बाणाची योग्यता अधिक समजली पाहिजे. परंतु आपल्या याहि कवीच्या ग्रंथांत एक मोठी उणीव आहेच. ती कोणती म्हणाल तर कालनिर्देशाची. बाणाच्या व श्री- हर्षाच्या जीवितकालाचा निर्णय त्याच्या कोणत्याच ग्रंथावरून करतां येत नाहीं, या गोष्टीच्या संबंधानें याच ठिकाणी अशी अडचण आली आहे असे नाहीं; तर आपल्या सर्व ग्रंथांतून प्रायः अशीच शोचनीय स्थिति आढळते ! . यामुळे आपली जी हानि झाली आहे, ती कधींहि भरून यावयाची नाहीं, यावरून कालनिर्देशाचे महत्त्व पूर्वकालीं समजत नव्हते असे दिसते. मग याचे कारण काय असेल याविषयीं कांहीं तर्क चालत नाहीं ! ज्योतिष व जैन ग्रंथांतून मात्र बहुतकरून कालनिर्देश केलेला आढळतो. बाण व श्रीहर्ष यांच्या जीवितकालाचा निर्णय एका बौद्धधर्मी चिनीयात्रे- करूच्या माहितीवरून व दुसऱ्याहि कांही गोष्टींवरून करण्यांत आला आहे. तो कसा, तें अनुक्रमानें पुढे सांगण्यांत येईल. आतां अगोदर त्या कालीं बौद्धधर्माचें बरेंच प्राबल्य होतें ह्मणून त्या धर्माच्या संबंधानें थोडेंसें सांगणें जरूर आहे तें सांगतोंः- 11 - बुद्ध, (चरित्र - टीपेंत) बौद्धधर्मावर हल्ले व तद्धर्मानुयायी-इसिंग, भर्तृहरि, दिवाकरमित्र, अशोक ( चरित्र -टीत ). बौद्धधर्माचा संस्थापक बुद्ध हा ईसवी सनाच्या पूर्वी सहावे शतकांत होऊन गेला. याचा निर्वाणकाल - ईसवीसनाच्या पूर्वी पांचशे त्रेचाळीस ( ५४३ ) वर्षे - झाला, असे सिलोन वगैरेकडील बौद्ध मानित आले आहेत. सुधारलेले १ "कालिदासाने ' मालविकाग्निमित्रांत ' जें ऐतिहासिक कथानक घेतलें तें श्री- हर्षाच्या कथानकापेक्षां ऐतिहासिकदृष्ट्या अधिक चांगले साधलेलें आहे. त्यावरून बाणापेक्षां कालिदासाची दृष्टि अधिक चांगली होती असे दिसतें. तथापि काल- निर्णयाच्या संबंधानें दोघांचीहि अनास्था आढळून येते. " अर्से एका आक्षेपकाचे मत आहे परंतु मला तसे वाटत नाही. याकरितां अभिज्ञवाचकांनी ऐतिहासिकदृष्टीनें अधिक चांगलेपणाबद्दल दोन्ही पुस्तके वाचून पहावी हाणजे कळून येईल. २ सिद्धार्थबुद्ध द्दा कोसलदेशांत ( अयोध्याप्रातांत ) 'कपिलवस्तु' या गांवीं