या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३१ ) हर्षाच्या वेळी हुएनस्यांगचा हिंदुस्थानांतील प्रवासकाल. बौद्धधर्मी चिनीयात्रेकरू हुएनस्यांगच्या लेखावरून हर्षाच्या जीवित- कालाचा निर्णय करण्यांत आला आहे. दूरदेशी असलेल्या बौद्धधर्मी लोकांपैकी काही लोक आपल्या पूर्वजांची इ० स० पूर्वी २४९ साव्या वर्षी तो आपला गुरु उपगुप्त याजबरोबर यात्रा करण्यास गेला. त्यानें बुद्धाचें जन्मस्थान कपिलवस्तु याचें दर्शन घेतलें. त्या ठिकाणीं त्यानें एक स्तंभ उभारून त्यावर भगवान् बुद्ध या ठिकाणी अवतरला, असें कोरून ठेविलें आहे. ज्या बोधिवृक्षाखालीं बुद्धानें तप केलें व मार [ कामरूपी] असुरावर जय मिळविला, तें गयाजवळचें स्थान व जेथे त्यांचे निर्वाण झालें तें कुशीनगर इत्यादि पवित्र स्थळे उपगुप्तानें अशोकास दाखविलीं. अशोकानें जागजागीं विहार, स्तूप, धर्मशाळा व धर्मानुशासनें कोरून ठेविली आहेत. त्याने आपल्या राज्यांत पशुहिंसा बंद केली व अनेक खातीं करून राज्यपद्धति व्यवस्थेशीर केली. त्यानें काठेवाड येथें गिरनार नांवाचें सरोवर करून त्याचे व इतर नद्यांचे कालवे काढून कृषिकर्मास उत्तेजन दिले. त्यानें रस्त्यांत खांब पुरून कोस दाखविले. शेतीच्या उत्पन्नांतून तो चतुर्थांश कर घेत असे आणि उद्योगधंदा व कला यांस उत्तेजन देत असे. उपद्रव व आज्ञाभंग करणारांस तो कडक शिक्षाहि करी. पूर्वी जितका निष्ठुर, तितका पुढें तो दयाळु झाला. त्यानें दूर देशीं भिक्षु पाठवून लोकांस बौद्धधर्मोपदेश करून त्या धर्माचा फार प्रसार केला. त्याने आपला भाऊ महींद्र व बहीण संघमित्रा यांनां धर्मप्रसाराकरितां सिंहलद्वीपांत पाठविलें. अशोकाची मुलगी चारुमती ही आपल्या बापाबरोबर नेपाळांत गेली होती, ती तिकडेच राहिली व तिनें तिकडे बौद्ध- धर्माचा प्रसार केला व आपला पति देवपाल याच्या स्मरणार्थ एक नगर वसवून त्याला देवपत्तन असे नांव ठेविलें. अशोक हा चक्रवर्ती राजा होता. त्याने सुमारे ४० वर्षे राज्य केले. ह्या मौर्यवंशांतल्या अशोकराजाची कारकीर्द इ. स. पूर्वी २७२ पासून इ. स. २३१ पर्यंत असल्याबद्दल इतिहासांत वर्णन आहे. अशोकाचा इतिहास असावा तितका उपलब्ध नाहीं, तथापि त्याच्या कोरीव लेखामुळे ऐतिहासिक माहिती- स बराच उपयोग झाला आहे. अशोकवर्धनाचें वर्णन विष्णुपुराणांत आहे. ह्या मौर्यराजाचें साम्राज्य १३७ वर्षे होते. इ. स. पूर्वी १८४ व्या वर्षी मौर्यवंशां- तला शेवटचा पुरुष Xवृहद्रथमौर्य यास त्याचा सेनापति पुष्पमित्रशुंग यानें सैन्य दाखविण्याच्या मिषानें मारले व त्याचे राज्य आपण बळकाविलें असें हर्षचरितांत आहे. वायुपुराण आणि विष्णुपुराण यांत मौर्यराजांची वंशावळ आहे. शुंगवंशोद्भवराजांनी x' प्रशादुर्बलं च बलदर्शनव्यपदेशदर्शिताशेप सैन्यः सेनानीरनार्यो मौर्य वृहद्रथं पिपेष पुष्पमित्र: स्वामिनम् ।'