या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३४ ) या कालनिर्णयास आणखी ताम्रपट व शिलालेख यांतील प्रमाणे. ( हर्ष आणि पुलकेशी यांजमधील युद्धाचा उल्लेख ) ( कालिदास व भारवी यांचा निर्देश ) . या गोष्टीच्या ( कालनिर्णयाच्या ) पुष्टीकरणार्थ आणखीहि प्रमाणे साप- डली आहेत. हर्ष हा पराक्रमी राजा होता व त्यानें पुष्कळ राजे पादाक्रान्त केले होते, तथापि नर्मदेच्या दक्षिणेस राज्य वाढविण्याचा जेव्हां त्यानें प्रयत्न केला, तेव्हां वातापी उर्फ बदामीपुरीचा चालुक्यवंशांतला राजा दुसरा सत्याश्रयपुलकेशी यानें हर्षास नर्मदेच्या अलीकडे येऊं दिलें नाहीं अशाविषयों आधार सापडला आहे. 6 ह्या सत्याश्रयपुलकेशीच्या वंशजांकडून अग्रहार दिल्याबद्दल जे ताम्र- पत्रलेख देण्यांत आले त्यापैकी जे सापडले आहेत. ते 'इंडिअन ऍटिक्वेरी' नांवाच्या पुस्तकांत छापले आहेत. त्यांत असा मजकूर आहे की, ' युद्ध कर ण्याविषयी निष्णात असलेल्या उत्तरदेशाधिपति हर्षवर्धनराजाचा पराभव केल्यामुळे ज्याला परमेश्वर ह्मणूं लागले, असा पृथ्वीपति महाराजाधिराज सत्याश्रय इ० , " समरसंसक्तसकलोत्तरापथेश्वरश्रीहर्षवर्धन पराजयोपलब्धपर- मेश्वरापरनामधेयः सत्याश्रयः श्रीपृथ्वीवलभमहाराजाधिराजः " इ० या व पुढील शिलालेखांतील वर्णनांवरून सत्याश्रयपुलकेशी हा शके ५३२ ह्मणजे इ०स० ६९०-९१ साली गादीवर बसला, तो शके ५५६ ह्मणजे इ० स० ६३४ सालापर्यंत पराक्रमाची कृत्यें करीत होता. हें ताम्र- पत्रांतील लेखांवरून सिद्ध होतें. , ' तसेच आणखी विजापुर जिल्ह्यांत ' आयंहोली या गांवीं सत्या. श्रयाचा आश्रित रविकीर्तिनामक जैनकवीनें मेगूती' (जिनेंद्रभवन ) नांवाचं देवालय बांधिले; त्यावेळीं शके ५५६ ह्मणजे इ० स० ६३४-३५ ह्या वर्षी शिलेवर पद्यमय लेख कोरून उमारला आहे. त्या लेखांतील पद्यांत 1 Indian Antiquary Vol. VI. and VII. 1878. २ हा शिलालेख समग्र पहाणे असल्यास प्राचीन लेख मांला भाग १ किंवा पुढील पुस्तकांत पहावा. Indian Antiguary, Vol. VIII, 1879; Saka 356 ( A. D. 634-35 )