या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३७ ) हुएनस्यांगचा प्रवासकाल व त्याने केलेले नामनिर्देश आणि कांहीं गोष्टींचे उल्लेख हे सर्व जमतात. यांवरून हर्षराजा हा सातव्या शतकाच्या पूर्वार्धीत होता है सिद्ध झालें. तेव्हां आतां हर्ष जर सातव्या शतकांत होता, तर वाण- कविहि त्याच वेळेस होता है अर्थातच सिद्ध झालें. बाणाच्या ग्रंथांत बाण व हर्ष यांच्या संबंधानें बरीच माहिती आहे, परंतु कालनिर्देश नसल्यामुळे हर्पराजा, आणि बाण, मयूर, वगैरे कवि केव्हां झालें, हें समजण्यास मुळींच मार्ग नव्हता, यामुळे त्यांत मोठे व्यंग राहिलें होतें. तें हुएनस्यांगच्या ग्रंथावरून व शिलालेखांतील उभयतांच्या संग्रामवर्णनावरून आणि कालानिर्देशावरून दूर होऊन त्यास विशेष महत्व आलें आहे यांत कांहीं संशय नाहीं. वाणानें हर्षचरिताच्या आरंभी वर्णिलेले पूर्वीचे कवि. ( प्रसंगानें डॉ० हॉल, बुलर, पिटरसन वगैरेंच्या मतांबद्दल विचार.) बाणकवीनें हर्षचरितांत प्रारंभी आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या कवींचें व त्यांच्या कवित्वाचें परमादरानें स्तवन करून त्यांजविषयीं आपली पूज्यबुद्धि प्रकट केली आहे. ते कवि हे होतः- - 66 नमः सर्वविदे तस्मै व्यासाय कविवेधसे । चक्रे पुण्यं सरस्वत्या यो वर्षमिव भारतम् || कवीनामगलद्दप नूनं वासवदत्तया शक्तचेव पाण्डुपुत्राणां गतया कर्णगोचरम् || पदवन्धोज्वलो हारी कृतवर्णक्रमस्थितिः भट्टारहरिचंद्रस्य गद्यवंधो नृपायते || आविनाशिनमग्राभ्यमकरोत्सातवाहनः विशुद्धजातिभिः कोशं रत्नैरिव सुभाषितैः || कीर्तिः प्रवरसेनस्य प्रयाता कुमुदोज्ज्वला सागरस्य परं पारं कपिसेनेव सेतुना || सूत्रधारकृतारम्भैर्नाटकै हुभूमिकैः सपताकैर्यशो लेभे भासो देवकुलैरिव ।। निर्गतासु न वा कस्य कालिदासस्य मुक्तिपु- प्रीतिर्मधुरसासु मञ्जरीष्विव जायते || समुद्दीपितकंदर्पा कृतगौरीप्रसाधना