या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३९ ) 11 JAN 1977 P अशीं विशेषणें योजिलीं आहेत, ती किती समर्पक आहेत ! ज्याने आपल्या वाणीनें पुण्यकारक भारत निर्माण केलें. असाही याच पद्यांत उल्लेख आहे. बाणानें ग्रंथारंभीं जसा व्यासाचा व इतर कांहीं कवींचा नाम निर्देश केला आहे तसा आद्यकवि वाल्मीकि याचा कां केला नाहीं, याबद्दल मनांत मोठी शंका उत्पन्न होते. बाकी वाणाच्या ग्रंथांत 'महाभारतपुराण- रामायणानुरागिणा' 'रामायणमिव कपिकथासंकुलं ' इत्यादि रामा- यणाचे अनेक ठिकाणीं उल्लेख आलेले आहेत. 6 पुढे वाणानें कवीनामशलद्द पौनूनवासवदत्तया' अर्से वासव- दत्तेचें वर्णन केले आहे. तेव्हां कालिदासादि कवींचा गर्व नाहींसा करणारी प्रस्तुत उपलब्ध असलेली वासवदत्ता - तिच्यांतील कवित्वावरून - तशी आहे असे वाटत नाहीं. व्याकरणमहाभाष्यकार पतंजलि यांनी ( ' तदधीते तद्वेद ' ह्या पाणिनीच्या सूत्रावरच्या ' आख्यानाख्यायिकेतिहासपुरा- , १ भारता संबंधानें गोवर्धनाचार्याचे पद्यहि फार सरस आहे. तें असें :- ‘ व्यासगिरां निर्यासं सारं विश्वस्य भारतं वंदे । भूषणतयैव संज्ञां यदंकिता भारती वहति ॥ १ गोवर्धनचार्यांनी व्यासवाणीचा मुपाक व सर्व विश्वांतील सार अशा भारतास नमन करून व्यासाच्या भारतामुळेच भारती हें नांव धारण करण्यास सरस्वतीस मोठें भूषण वाटतें असे यांत वर्णन केले आहे. किती खुबीदार पद्य आहे हैं! २ गोवर्धनाचार्यांनी सप्तशतीत रामायणास आग्रस्थानी बसविले आहे:- श्रीरामायणभारतबृहत्कथानां कवीन्नमस्कुर्मः । त्रिस्रोता इव सरसा सरस्वती स्फुरति यैर्मिन्ना || 66 29 या आर्यंत आचार्यानीं रामायणास श्रीपद जोडून मुख्यस्थानी बसविलें आहे तें योग्यच आहे व आर्येतला अनुक्रमहि यथायोग्य आहे ! कारण, महाभारतांतदेखील रामायणाचें सार दिले आहे. यावरून व रामायणांतील वाल्मीकीचें पद्य महाभारतांत व्यासांनी सात्यकीच्या तोंडी जसेचे तसेच घातले आहे यावरून रामायण हे महाभारताच्या पूर्वीचे असल्याबद्दल उघडच सिद्ध होते. अर्जुनाने छिन्नबाहु केलेल्या भूरिश्रव्यास सात्यकीनें युद्धांत मारिलं तेव्हां सर्व यो यांनी सात्यकीचा निषेध केला असतां ' निःशस्त्र झालेल्या अभिमन्यूस अनेक वीरांनी एकत्र होऊन कसे मारिलें ? ' है उदाहरण देऊन, इंद्रजित मायावी सीतेचा वध करूं लागला, तें खरें समजून, हनुमंतानें त्याचे निवारण केले असतां वाल्मीकीनें इंद्रजिताच्या तोंडी घातलेला श्लोक सात्यकीनें हाटला आहे, तो असा:--