या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४२ ) , प्राचीन काळीं वासवदत्तेची कथा फार लोकप्रिय होती. बृहत्कथेतील वत्सराज व वासवदत्ता यांची कथा कथासरित्सागरांत व बृहत्कथा- मंजरींत घेतली आहे. कालिदासानेंहि मेघदूतांत 'प्रद्योतस्य प्रियदुहि - तरं वत्सराजोऽत्र जन्हे ' इ० वासवदत्तेच्या संबंधानें वर्णन केले आहे. मालतीमाधव रत्नावली, प्रियदर्शिका इ० नाटकांतहि वासवदत्तेचा निर्देश आहेच. यावरून ही कथा व हें नांव पूर्वी फारच लोकप्रिय असल्याचें दिसून येतें. पुढे बाणकवीनें हरिचंद्राच्या गद्यबंधाचा व सातवहान (हाल) याच्या सुभाषितकोशाचा ( गाथासप्तशतीचा ) उल्लेख केला आहे. हरिचंद्राचा गद्यबंध हल्लीं सापडत नाहीं ! नंतर सेतुबंध काव्याचा कती प्रवरसेन याचा व नंतर अनेक नाटकांचा कर्ता भासंकवि याचा उल्लेख केला आहे. परंतु भासकवीचें एकहि नाटक हल्ली उपलब्ध नाहीं, ही मोठ्या दुःखाची गोष्ट होय ! असे आपले शेंकडों अमोलिक ग्रंथ नाहीतसे झाल्यामुळे आपली किती हानि झाली असेल ती परमेश्वरासच माहीत ! भासाची नाटकें नाहीं- तशीं झाल्यामुळे " भासो हासः " ह्या जयदेवकवीच्या उक्तीप्रमाणे कवितारमणीचे हास्यच नाहींसें झालें. असो. भासकवीचीं थोडीं पधें मात्र त्याच्या नांवावर कांहीं ग्रंथांतून आढळतात. तथापि त्यावरून देखील तो कविश्रेष्ठ होता असे झणण्यास कांहीं हरकत दिसत नाहीं ! मासल्याकरितां त्याचे एकच पद्य पुढे दिले आहे, त्यांत चंद्रोदय झाल्यावर चंद्रिकेचें वर्णन भ्रांतिमदालंकारांत त्याने केले आहे. ते पद्य हे होय:- “कपाले मार्जारी पय इति कराँल्लेढिशशिनः तरुच्छिद्र प्रोतान्बिसमितिकरी संकलयति । रतांते तल्पस्थान् हरति वनिताप्यंशुकमिति प्रभामत्तचंद्रो जगदिदमहो विप्लवयति " -- या एका पद्यावरून देखील त्याचें सरस कवित्व असल्याचे दिसून येतें ! बाणानें भासाच्या वर्णनांत " सूत्रधारकृतारं भैर्नाटकै बहुभूमिकैः "" १ कालिदासानें मालविकाग्निमित्रांत भासाचा उल्लेख केला आहे तो असा:- " पारि०मातावत्प्रथितयशसां भासकवि सौमिल्लकत्रिमिश्रादीनां प्रबंधानतिक्रम्य वर्त मानकवेः कालिदासस्य क्रियायां बहुमानः

)