या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४३ ) असे घातले आहे. यावरून वेबर व पिटरसनसाहेबांनी असा तर्क केला आहे कीं हिंदूंचें ग्रीकलोकांशीं दळणवळण पडल्यावर त्यांची नाटके पाहून हिंदूंनी त्यांचे अनुकरण केले असावें. जशी कांहीं ईश्वरानें युरोपियनांनांच कायती नाटकग्रंथ करण्याची प्रतिभा दिली आहे, इतरांनां नाहीं ! असो. आमच्या साहित्यशास्त्राप्रमाणे नाटकांत सूत्रधार, विदूषक इत्यादि पात्रें अवश्य असलीच पाहिजेत ह्मणून जर नियम आहेत, तर आमचें प्राचीन साहित्यशास्त्रहि ग्रीकलोकांच्या संबंधानेच उत्पन्न झालें असें ह्मणावें लागेल ! सारांश युरोपियनांनी पाहिजेत तसे तर्क करून पांडित्य केलें तरी तें शोभतें इतकेंच ! बाकी सर्वच त्यांचे तर्क ग्राह्य असतात असे नाही ! यानंतर कालिदासाच्या काव्याची प्रसंशा आहे, व ती यथार्थच आहे. कालिदासाची काव्ये सर्वत्र प्रसिद्धच आहेत. पुढे बृहत्कथेचा निर्देश केला आहे. तिचा कर्ता गुणाढ्य नांवाचा कवि होता. बृहत्केथा ह्मणून मूळ पैशाची भाषेत लक्षश्लोकात्मक मोठा ग्रंथ होता तो नष्ट झाला आहे ! त्याची संस्कृतांत संक्षिप्त व विस्तृत भाषांतरें - बृहत्कथामंजिरी व कथासरित्सागर - अशी आहेत व ती प्रसिद्धच आहेत. पहिल्याचा कर्ता क्षेमेंद्र व दुसन्या चा सोमदेव होय. पुढे बाणानें आढ्यराजकवीचा निर्देश केला आहे. पण याचाहि ग्रंथ सांप्रत उपलब्ध नाहीं ! बाणकवि - त्याचा पुत्र, त्यांचे ग्रंथ, त्यांचें कवित्व, बोधप्रदस्थळें व त्यावेळची स्थिति इत्यादि. , बाण हा गद्यरचनेत अग्रगण्य होता यांत कांहीं संशय नाहीं. त्याच्या वाणी- चा प्रवाह शरदऋतूंतील गंगेच्या प्रवाहाप्रमाणे प्रसन्न व अस्खलित चालले ला असा दिसतो. त्याची भाषा प्रौढ व रसाळ आहे असे ' वश्यवाणीत्व' क्वचितच आढळेल ! हर्षराजानें बाणास, 'वश्यवाणी कविचक्रवर्ती' अशी पदवी दिली ती अगदीं यथार्थ आहे. , १' भूतभाषामयीं प्राहुरगुतार्थी बृहत्कथाम् ' | दंडी - - काव्यादर्श. २ चालुक्य राजांपैकी दुसरा ' जगदेकमल्ल याच्या वेळेस ' दुर्गासिंह' नांवाचा कवि होता, त्यानें 'कर्नाटक पंचतंत्र' नांवाचा ग्रंथ केला आहे. त्यांत त्याने आपल्या पूर्वीच्या महाकवींचे निर्देश केले आहेत. त्या ठिकाणीं ' अवनिधवचक्रवर्ती नरेंद्रप्रवर हर्ष ' यानें बाणास आपले पदरीं ठेविले होते व त्यास ' वश्यवाणीकवि- चक्रवर्ती' अशी पदवी दिली होती, असे त्या ग्रंथांत लिहिले आहे. ही माहिती प्रो. पाठक यांनी त्या पुस्तकांतून सांगितली. ,