या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४५ ) निरीक्षणशक्ति तीव्र असल्यामुळे त्याच्या कवित्वांत स्वभावोक्ति, उपमा, दृष्टांत, वगैरे प्रकारांत मार्मिकता येऊन त्याची वर्णनें चटकदार झाली आहेत. हर्षचरितांत ब्रह्मदेव, सरस्वती, दुर्वास, वाणपूर्वज, बाण, पुष्पभूति, प्रतापवर्धन, यशोवती, राज्यवर्धन, व हर्ष आणि कादंबरीत वैशंपाय- न (राघू) जावालि, हारित, चंद्रापीड, कपिंजल, महाश्वेता, पुंडरीक, कादंबरी इत्यादि पात्रांचीं स्वभावर्णनें अगदर्दी रेखलेली आढळतात! कादंबरीत तर प्रायः सर्वत्र प्रसादगुण फारच चांगला साधलेला आहे. हर्षचरितांत तितका जरी वाटत नाहीं, तरी ऐतिहासिक विषयाचे स्वरूप लक्षांत आणले असतां पुष्कळ ठिकाणीं तो चांगलाच उठला आहे, असें ह्मणण्यास बिलकूल शंका वाटत नाहीं ! आर्यलोकांच्या संस्कृत भाषेची खुबी ज्यांना पहावयाची असेल त्यांनी बाणकवीचे ग्रंथ अवश्य वाचावे ! हर्षचरितांत वीर, करुण व अद्भुत हे रस बरेच असून कादंबरीत शृंगार व करुण हे रस ओतप्रोत भरलेले आहेत व मधून मधून अद्भुत रसहि बराच आहे. गद्यांत जसें विषयप्रतिपादन होते तसें पद्यांत होत नाहीं हें खरें, तथापि आमच्या संस्कृतकवींचे गद्यग्रंथ झटले झणजे निराळ्या तऱ्हेचे असून कवित्वांत पद्यग्रंथासहि मार्गे सारणारे असे आहेत! यांत छंदच काय ते कमी, बाकी अलंकारादि सर्व प्रकार यांत उत्तमरीतीनें साधतां येतात. कवि मात्र बाणभट्टासारखा पाहिजे, व म्हणूनच गद्यग्रंथास 'गद्यमयं काव्यं कादं- वर्यादि' असें साहित्यशास्त्रांत झटले आहे. काव्यांत मनोरंजन असून सृष्टीं- तील अनेक गोष्टींचा वाचणान्याच्या मनावर ठसा उमटणें, मध्ये मध्यें बोध असणे, ऐतिहासिक गोष्टींशी संबंध असणे, इत्यादि प्रकार असले तर फारच चांगलें. हर्षचरितांत ऐतिहासिक भाग बराच असून बोध व मनोरंजन हि आहे. कादंबरींत तर सर्वत्र मनोरंजन असून कांहीं कांहीं भाग बोधपरहि आहेत. दोन्ही पुस्तकांत सृष्टीतील अनेक प्रकारची चित्रे वाचकांच्या मनांवर सुरेख उमटण्यासारखे बरेच प्रकार आहेत. बाणकवीच्या ह्या दोन्ही पुस्तकां च्या परिशीलनाने आर्यलोकांचे पूर्वीचं वैभव, त्यांचे पराक्रम, आचार, विचार वगैरे अनेक गोष्टी लक्षांत येण्यासारख्या आहेत. तारापीडराजाने नगराबाहेर , विस्तीर्ण विद्यालय बांधून त्या ठिकाणीं