या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४६) अनेक विद्या व कला यांत प्रवीण असलेल्या गुरूंची योजना करून आपला एकुलता एक पुत्र चंद्रापीड व आपल्या प्रधानाचा पुत्र वैशंपायन यांस विद्याभ्यासाकरितां दहावर्षे पर्यंत तेथें ठेविलें होतें. यावरून अशा प्रकारें विद्याभ्यास करण्याची चाल पूर्वकाली आमच्यांत होती. तसेंच जागजागीं वेद- शास्त्राध्ययनें चालू असल्याची अनेक वर्णने असल्यावरून, त्या वेळीं स्व- विद्येकडे सर्वांचें चांगलें लक्ष व अभिमान असल्याचें लक्षांत येतें. ' अनेक गुप्तार्चितपादपङ्कजः ' ' स्फुरन्महावीरसनाथमूर्तिभिः ' इ० वर्णनावरून, तसेंच हर्षराजाच्या उदार आश्रयावरून बाण, त्यांचे पूर्वज व इतर विद्वज्जन यांस राजेरजवाड्यांकडून चांगला आश्रय मिळून त्यांची मानमान्यता योग्य रीतीनें राहत असे. यावरून पूर्वकालीं राजेरजवाडे यांजकडून विद्वज्जनांस उत्तम प्रकारचें उत्तेजन मिळत असे, अर्से उघड दिसतें. अर्से नसतें तर बाणाचा बाप त्याचे चवदावे वर्षी वारला असतां त्याचें वैभव एखाद्या संस्थानिकासारखें होतें, तें कसें राहिलें असतें ? ह्या दोन्ही पुस्तकांत कांहीं स्थळें बोधपरहि आहेत. ' हर्षचरितांत सरस्वती हसल्यामुळे क्रोधांध झालेल्या दुर्वासऋषीस ब्रह्मदेवानें केलेला उपदेश, हर्षाचा बंधू कृष्णराज यांचा बाणकवीस धैर्योत्तेजनपर निरोप व त्यांत त्याचें दर्शविलेलें सौजन्य, परोपकारकर्तृत्व; तसाच हर्षाचा बाप प्रभा- करवर्धन यानें आपलेपाशीं सेवक कसे बाळगावे, याविषयी आपल्या दोघ पुत्रांस केलेला उपदेश, हर्षाचा सेनापति सिंहनाद यानें हर्षाच्या अंगांत वीरश्री येण्यासारखे केलेले उपदेशपर भाषण व हस्तिसैन्याचा अधिपति स्कन्दगुप्त यानें विश्वास ठेवून गैरसावध राहिल्यामुळे कसे कसे घात होतात याविषयीं पूर्वेतिहासांतील अनेक उदाहरणे सांगून त्यास सावध राहण्या. करितां केलेला उपदेश, दिवाकरमित्रानें हर्षास व त्याचे बहिणीस झालेलें असह्य दुःख दूर होण्याकरितां केलेला उपदेश; तसाच कादंबरीत चन्द्रापीडा- स यौवराज्याभिषेक होण्याच्या वेळेस शुकनासप्रधान यानें श्रीमदानें मनुष्य अंध होऊन त्याजकडून कसे कसे प्रमाद घडतात, याविषयीं केलेला विस्तीर्ण व मार्मिक उपदेश आणि कपिंजलानें पुंडरीकास विषयासक्ती- पासून परावृत्त होण्याविषयी केलेला उपदेश, इत्यादि स्थळे बोधपर आहेत. त्याचप्रमाणे मरणसमयीं प्रभाकरवर्धनाने 'प्रजारंजनांच्या योगानेंच राजे