या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुस्तके बंधुमान् ह्मणजे साहय्यसंपन्न होतात, स्वज्ञातीच्या योगानें होत नाहींत !" ८ ' प्रजाभिस्तु बंधुमन्तो राजानः न ज्ञातिभि:' असा हर्षास उपदेश केला आहे. ह्या एका वाक्यांतच किती उदात्त तत्त्व भरलें आहे हें राज्यकर्ते व राजपुरुष यानीं ध्यानांत ठेवण्यासारखें आहे ! हर्षचरितावरूनच पाहिलें तरी त्यावेळी ह्या देशांत शौर्याची कृत्यें करणारे पुष्कळच पुरुष असून परा क्रमाची चळवळ जिकडे तिकडे एकसारखी चालू होती; त्यामुळे देश सचेतन असल्याचे दिसत होतें ! आतां ह्या पुस्तकांतील कांहीं कांही गोष्टी असंभाव्य वाटण्यासारख्या आहेत. मरणास टेकलेल्या प्रतापवर्धनाचा हर्षास लांबलचक उपदेश, आपल्या बहिणींचें वर्तमान ऐकण्याविषयी उतावीळ झालेल्या बौद्धभिक्षूचें लांबच लांब भाषण, हीं कंटाळवाणीं व त्या प्रसंगास अनुचित अशी वाटतात. महाभारतांत श्रीकृष्णानें रणभूमीत अर्जुनास अठर। अध्याय गीता सांगून केलेला उपदेश इत्यादि गोष्टींवरून विचार केला असतां हीं वर्णनेंहि दोषाई नाहीत असे ह्मणणें भाग आहे; कारण, यांतील वर्णनें केवल इतिहासासच अनुसरून आहेत असेच केवल नाही, तर ती महाकवीच्या कवित्वांत गुर फटली गेली असल्यामुळे वर्णनाच्या भरांत विस्तृत झाली असावी. श्रीकृष्णानें अर्जुनास तरी संग्रामप्रसंगी भगवद्गीतेची प्रमेयेंच संक्षेपार्ने सांगितली असावी. नंतर तीच यथाकाली विस्तृत रीतीनें विशद केलीं असावीं असें वाटतें. तथापि ह्यासंबंधानें मतभेदहि होण्याचा संभव आहे. · हर्षचरित देखील अपुरेंच राहिले आहे. ह्याच्या प्रास्ताविक- पद्यांत ' किं कवेस्तस्य काव्येन सर्ववृत्तान्नगामिनी | कथेव भारती यस्य न व्याप्नोति जगत्त्रयम् ॥' व पुढे कस्य न द्वितीय- ' महाभारते भवेदस्य चरिते कुतूहूलम् ' असे दोन वेळां बाणानें टलें आहे. यावरून त्याच्या मनांत हर्षचरित हा ग्रंथ महाभारतासारखा मोठा करावयाचा होता, असे उघड दिसतें . हल्ली उपलब्ध असलेल्या हर्षचरितांत हर्षाच्या पहिल्या मोहिमेचें वर्णन देखील पुरे झालेले नाहीं, व आठवा उच्छ्वास देखील शेवटास न जातां अपुरराच राहिलेला दिसतो ! व म्हणूनच इतर उच्छ्रवासांप्रमाणे आठव्या उच्छ्वासाच्या समाप्तीत त्यांचे नांव देखील. दिलेलें नाहीं. यामुळे तो अपूर्णतेची साक्ष देत आहे ! हर्षचरितांत शेवटीं