या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४८ ) सूर्यास्त व चंद्रोदय यांचे वर्णन केले आहे. यावरून शत्रूंचा अस्त व हर्षाचा उदय ध्वनित होतो व यामुळे त्याने पुढील वर्णन तशाच कांहीं अपरिहार्य अडचणीमुळे संक्षेपांत किंवा संपुष्टांत आणून ठेविलें असावें, अर्से मनांत येतें ! किंवा अस्तोदयाचा हा सहजगतीनेंच योग जमून आला असावा! पुढे शत्रूंचा अस्त व हर्षाचा उदय यांचा सूर्यास्तव चंद्रोदय यांच्याशीं कदाचित् काकतालीयन्यायानें योग जमून आला असावा असे वाटतें. असा प्रकार कधीं कधीं घडून येतो. हर्षाचा उदय व त्याच्या शत्रूंचा अस्त ( पराभव ) झाला असावा. याबद्दल पुढे विवेचन केले आहेच. बाणाने अगोदर हर्षचरित चिलें व नंतर कादंबरी रचली असावी, असें मला प्रथन वाटलें होतें. परंतु हल्ली विचार करितां दोन ग्रंथांपैकी कोणता अगोदर व कोणता मागून रचला, हें निश्चितपणे ठरविणे कठिण आहे. हर्षचरितांत वाणाने आपल्या आतेस साक्षात् महाश्वेता असें झटलें आहे. यावरून कादंबरी अगोदर रचली असल्यामुळे त्यानें तीस कदाचित् महा- श्वेता झटले असावें, असेंहि मनांत येतें ! किंवा दोन्ही ग्रंथ त्यानें बरोबरच चालविले असावे असेंहि होणें असंभवनीय नाहीं, बाणपुत्रास कादंबरी पूर्ण करितां आली. परंतु त्यास हर्षचरिताची ऐतिहासिक माहिती पूर्ण अवगत नसल्यामुळे ह्मणा, किंवा कालक्रीडेमुळे ह्मणा, हर्षचरित परिपूर्ण करितां आलें नाही! ही अत्यंत दुःखाची गोष्ट होय. दोनहि ग्रंथ वाणकवीकडूनच त्यानें योजल्याप्रमाणे शेवटास गेले असते, तर किती मौज व फायदा झाला असता! त्यांतहि हर्षचरित शेवटास गेलें असतें तर ऐतिहासिक माहिती अधिक मिळून १ कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेच्या शेवटच्या अंकांच्या आरंभी दिलेला कर्तव्यसमाप्तिसूचक श्लोक व त्यांचा अंत, यांचा जसा अकल्पित मेळ जमून आला ! तसाच हाहि प्रकार घडून आला असेल ! शेवटच्या निबंधमालेच्या अंका- वरचा श्लोक हा होय, 66 " गाहन्तां महिपा निपानसलिलं डेर्मुहुस्ताडितं । छायाबद्धकदंबकं मृगकुलं रोमन्थमभ्यस्यतु || विश्रब्धं क्रियतां वराहततिभिर्मुस्ताक्षतिः पल्वले । विश्रामं लभतामिदं च शिथिलज्याबंधमस्मद्धनुः ॥ पुढे थोड्याच दिवसांनी कै. विष्णुशास्त्री यांच्या आयुष्याची दोरी शिथिल होऊन त्यांचा अंत झाला !