या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

12 O NOV 2013 वाचकांस थोडा बहुत परिचय होईल इतकेंच नव्हे, तर त्यांपासून बोध, ऐतिहासिक ज्ञान व मनोरंजनहि होण्यासारखे आहे. बाणकवीचा काल हा अर्वाचीन हिंदुस्थानच्या इतिहासांतील हिंदुलोकांच्या भरभराटीचा बहुतेक शेवटचाच काल होता, असें झटलें तरी चालेल. तेव्हां तत्कालची स्थिति आणि तीहि एका मोठ्या संस्कृतकवीच्या व गद्यग्रंथकाराच्या द्वारें महा- राष्ट्र वाचकांपुढे पांडुरंगशास्त्री यांनी मांडली याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. अशा प्रकारचे मराठींत आणखी जितके ग्रंथ होतील तितके चांगलें; परंतु तसे होणें सर्वस्वी लोकाश्रयावर अवलंबून आहे. पुणे. तारीख १४ आक्टोबर १९०२. ( सही ) बाळ गंगाधर टिळक. बी. ए. एल्. एल्. बी. ( केसरीपत्राचे कर्ते. ) मी रा. रा. पांडुरंगशास्त्री पारखी यांनी बाणभट्ट कवीवर लिहिलेला निबंध वाचिला. यांत बाणभट्टाचा व त्यास उदार आश्रय देणाऱ्या श्रीहर्ष- राजाचा व कवीचा कालनिर्णय चिनई प्रवाशांच्या हकीकती, ताम्रपट, कोरीव लेख, व संस्कृत ग्रंथ यांच्या आधाराने पाश्चात्य ऐतिहासिक पद्ध- तीनें केला आहे. या पद्धतीची योजना मराठीत लिहिलेल्या ग्रंथांत अली- कडेच सुरू झाली आहे, व जुन्या पद्धतीनें पढलेल्या शास्त्रयांत तर मला वाटतें अपूर्वच आहे. · कै. विष्णुशास्त्री यांनी बाणभट्टावर एक निबंध लिहिला आहे, यांतील कांहीं चुका, तशाच डॉ. हॉल व प्रोफेसर वुईलसन यांच्या चुका रा. रा. पांडुरंग. शास्त्री यांनी चांगस्था दाखविल्या आहेत. १ हर्षचरित्र व कादंबरी यांतील उत्तम स्थळे शास्त्रीबोवांनी मार्मिकपणे दाखविली आहेत. त्यांचे पूर्वीचे गद्यात्मक व पद्यात्मक ग्रंथ मीं बहुतेक वाचले आहेत. त्यांच्या संस्कृत कविता केसरींतून मधून मधून येतात, त्यांपैकी कांहीं मीं वाचिल्या आहेत. शास्त्रीबोवांची विद्वत्ता, रसिकता, शुद्ध व प्रौढ मराठी लिहिण्याची हातोटी, मला पूर्वीपासून माहीत आहे. बाण- भट्टावरील या निबंधांत हे सारे गुण सरस वठले आहेत. हा निबंध वाचून मला बरीच नवीन माहिती मिळाली व आनंदहि झाला. यास लोकांचा