या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५४ ) योग्य होतात, तशीं माझ्या पित्यानें गर्भितार्थादिकानें युक्त अशीं बीजें हर्ष- चरित' 'कादंबरी' इत्यादि सुभूमीत पेरून रसयुक्त केल्यामुळे विकास पावून चांगली पोसली गेलीं, तीं सुफले त्याच्या पुत्रास आयतींच घेण्यास सांपडली ! यावरून त्यानें आपल्या बापाच्या ग्रंथांचा चांगलाच अभ्यास केला असावा असे लक्षांत येतें ! बाणपुत्राने उत्तरार्धाच्या आरंभी किंवा शेवटीं आपलें नांव न घालतां गुप्त ठेविलें, याचॆं कारण पितृभक्तीमुळे " सर्व ग्रंथ आपल्या बापाच्याच नांवानें प्रसिद्ध असावा, या उद्देशानें त्यानें आपलें नांव प्रकट न करितां बुद्ध्याच नाहींसें होऊं दिले असावे असे वाटतें " असे कै. विष्णु कृष्ण चिपळूण- कर यांनी आपल्या बाणभट्टाच्या निबंधांत ह्मटलें आहे; परंतु तसें असतें तर, " याते दिवं पितरि तद्वचसैव सार्धं विच्छेदमाप भुवि यस्तु कथाप्रवन्धः । दुःखं सतां तदसमाप्तिकृतं विलोक्य प्रारब्ध एव स मया न कवित्वदपत् माझा पिता आपल्या वाणीसह स्वर्गास गेला असतां त्याच्या कथाप्रबंधाचा विच्छेद झाला त्यामुळे विद्वज्जनास झालेले दुःख पाहून तो पुरा करण्यास मी आरंभ केला ! मीं आपलें कवित्व दाखविण्याकरितां केला नाहीं!' असे त्यानें ह्मटलें नसतें. आरंभीच्या पद्यांत त्याने आपले नांव न घालण्याचे कारण, पित्याच्या कृतीपुढे आपली कृति कांहींच नाहीं, असा विनय दाखविण्या- करितांच त्याने असें केलें असावें असे दिसतें. कादंबरीतील पितापुत्रांची वर्णनशैली प्रायः सारखीच जोरदार, खुबीदार व डौलदार आहे यांत कांहीं संशय नाहीं. दोघांची शृंगारादि वर्णनेंहि प्रायः मर्यादेस सोडून नाहीत. तथापि उत्तरभागांत वाणपुत्रानें चंद्रापीडाच्या मनोराज्यांतील काल्पनिक सुरतवर्णन केले आहे ! हें आमच्या कविसंप्रदायास अनुसरूनच आहे ! बाणपुत्रानें ' कामातुराणां न भयं न लज्जा' याचें चित्र वैशंपायनाच्या कामातुरतेंत व महाश्वेतेचें कडक पातिव्रत्याचरण याचे चित्र तिच्या वर्तनांत चांगले दाखविले आहे. सारांश कादंबरी है काव्य वाण व पुलिंद ह्यांच्या संयोगानें खरोखरीच हृदयभेदक झालें आहे यांत कांहीं संशय नाहीं ! !