या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५५), 66 कादंबरीरसभरेण समग्र एव ।। मत्तो न किञ्चिदपि चेतयते जनोऽयम् " कादंबरी ( पक्ष - मद्य ) च्या रसानें लोक त्यांत अगदीं तन्मय होऊन जातो, त्यास मग कांहींच भान रहात नाहीं ! असें बाणपुत्रानें उत्तरार्धाच्या आरंभी श्लेषोक्तीनें ह्मटलें आहे ते किती यथार्थ आहे ! 21 JAN 1994 " सुभाषितरसास्वादबद्धरोमांचकंचुका:- विनापि कामिनीसंगादभिज्ञाः सुखमासते " ॥ अशी एका कवीची उक्ति आहे तीहि अगदीं यथार्थ आहे ! ह्या वरील सुभाषितांत तरी बाणपुत्राच्या उक्तीचेंच पर्यायानें समर्थन केलेले आहे. बाणकवीचीं काव्यें वाचीत असतां अभिज्ञरसिक-पुरुषांच्या अंगावर खरोखरीच रोमांचकुंचक उभे राहून ते त्या काव्यरसांत अगदीं गर्क होऊन राहतात यांत कांहीं संशय नाहीं ! वाणाचें चंडिकाशतक, त्याचा श्वशुर मयूरकवि व मातंगदिवाकर. " चंडिकाशतक' हे एक पद्यमय काव्य बाणकवीनें केले आहे. यांत देवीचें स्तवन आहे. यांतील कवित्व प्रौढ व शब्दालंकारप्रचुर आहे याविषयी अशी एक कैथा प्रसिद्ध आहे की, बाण आणि मयूर हे दोघे कवि आप्त व मित्र असून श्रीहर्पराजाच्या पदरी होते. मैयूरकवीची मुलगी बाणा- स दिली होती. मयूरकवीनें एक काव्य रचून तें बोणकवीस दाखविण्या करितां तो पहाटेस उटून गेला असतां वाण आपल्या संस्कृतज्ञ प्रियेची संस्कृत पद्यानेंच समजावणी करीत होता. तें पद्य हें होय :-. " गतमाया रात्रि: शशिमुखि शशी शीर्यत इव मदीपोयं निद्रावशमुपगतो घूर्णत इव । मणामान्तो मानस्त्यजसि न तथापि क्रुधमहो' १ प्रत्येक महाकवीविषयी अशा कांहीं दंतकथा प्रसिद्ध आहेत यावरून त्यांच्यांत कांही विलक्षण गुण असल्यामुळे अशा दंतकथा चालू राहतात असे वाटतें. २ मयूरशतकाच्या मधुसूदनकृतं भावबोधिनी टीकेंत पुढे लिहिल्याप्रमाणें मजकूर आहे:- - “ मालवराजस्योजयिनीराजधानीकस्य कविजनमूर्धन्यस्य रत्नावल्याख्यनाटिका- कर्तुर्महाराज श्रीहर्षस्य सभ्यौ महाकवी पौरस्त्यौ बाणमयूरावास्ताम् । तयोर्मध्ये मयूर- भट्टः श्वशुरः | बाणभट्ट कादंबरीग्रंथकर्ता तस्य जामाता 11 ११