या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५६ ) असे तीन चरण ह्मणून पुढे ह्मणणार होता, तो दारापाशी आलेल्या मयूरकवीनें सहज विनोदानें- 6 कुचप्रत्यासत्या हृदयमपि ते चण्डि कठिनम् ' || असा चवथा चरण ह्मटला ! तो ऐकून आपणास ह्मणावयाचा त्या अर्था- चाच यानें हा चरण ह्मणून पूरण केले ह्मणून बाणास आनंद होऊन तो मनांत खजीलहि झाला ! परंतु त्याच्या मानिनी स्त्रीस अत्यंत राग येऊन तिनें ‘तूं कुष्टी होशील' ह्मणून आपल्या पित्यास शाप दिला ! तेव्हां त्यानें 'सूर्य- शतक ' करून, सूर्यास प्रसन्न करून आपला महारोग घालविला. ते पाहून बाणकवीनें ईयेने आपले पाय तोडून घेऊन 'चंडिकाशतक' स्तोत्र करून देवीस प्रसन्न केलें व आपलें व्यंग दूर करून दाखविलें ! ह्या अख्यायिकेंत मयूर हा बाणाचा आप्त व मित्र झटलेला आहे. आतां मयूरक त्याचा बालमित्र होता' असें कै० विष्णुशास्त्री यांच्या निबंधांत आहे. परंतु ' मयूरक ' या नांवाचा त्याचा कोणी बालमित्र असल्याबद्दल हर्षचरितांत कोठें उल्लेख नाहीं. बाणकवीने आपले मित्र, व आपणाबरोबर असलेली मंडळी यांचा नामनिर्देश केला आहे. त्यांत ' मयूरक ' म्हणून एक आहे, परंतु तो त्याचा मित्र झटलेला नसून ' जांगूलिको मयूरकः त्याचेबरोबर असलेल्या मंडळीत 'मयूरक' ह्मणून एक विषवैद्य (गारुडी) होता ! तथापि श्रीहर्पाचे पदरीं बाण व मयूर हे दोघेही एकाच कालीं होते, अशी प्रसिद्धि चालत आलेली आहे व ती पुढील दोन्ही पद्यांवरून तर खरीच ठरते. अहो प्रभावी वाग्देव्या यन्मांतङ्गदिवाकरः । श्रीहर्षस्याभवत्सभ्यः समो बाणमयूरयोः " || , राजशेखर. " १ ह्मणूनच ' आदित्यादेर्मयूरादीनामिवानर्थनिवारणम्' असे काव्यप्रकाशांत झटले आहे. राजशेखर यानें पुढील पद्यांत मयूरकवीच्या सूर्यशतककाव्याची प्रशंसा केली आहे व त्याप्रमाणें तें खरोखरीच प्रौढ व चांगले आहे:- - ' दर्प कविभुजंगानां गता श्रवणगोचरम्- विषविद्येव मायूरी मायूरी वानिकृन्तति ॥ ' , २ श्रीहर्षाच्या सभेत बाण व मयूर यांच्यासमान मातंगदिवाकर हाहि एक कवि होता, झणजे त्यांच्यासारखाच याचाहि मान होता. आतां मातंग याचा अर्थ चांडाल [ हलक्या जातीचा ] असा होतो व येथें कोणी हाच अर्थ घेतात !