या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५७) " सचित्रवर्णविच्छित्तिहारिणोरवनीश्वरः श्रीहर्ष इव संघ चक्रे बाणमयूरयोः " ॥ नवसाहसांकचरित. ह्या दोन्ही पद्यांवरून व त्यांतहि दुसन्या पद्यावरून श्रीहर्षाच्या दरबारी बाण व मयूर यांचा संयोग झाला, असें ध्यानांत येतें. हे दोघे कवि श्रीहर्षा- च्या येथें सभासद होते असें मधुसूदनाच्याहि लेखांत आहे. पार्वतीपरिणय, (अनेक कवींचीं समानार्थक पधें ) चाण व वामनवाण. ( कै. वि. कृ. चिपळूणकर, पं. कृष्णमाचार्य इ० ) पार्वतीपरिणय –हें एक नाटक बाणकवीच्या नांवावर प्रसिद्ध आहे. ह्या नाटकाच्या आरंभी- - "" " अस्ति कविसार्वभौमो वत्सान्वयजलधिसंभवो बाणः । नृत्यति यद्रसनायां वेधोमुखलासिका वाणी || अर्से पद्य आहे. ' वत्स' वंशांतच बाण उत्पन्न झाला. तेव्हां त्यानेंच हैं नाटक रचलें, अर्से समजणे साहजिकच आहे. यावर कोणाचा असा आक्षेप आहे कीं, ह्या नाटकांत बहुतेक ठिकाणी कालिदासाच्या कुमार- संभावांतील चोरून उतारे घेतले आहेत, व ह्मणून हे नाटक बाणाचें नसावें. मीं ह्रीं दोन्ही काव्ये वाचलीं, परंतु मला तसे वाटलें नाहीं. आतां 'कुमारसंभव' व 'पार्वतीपरिणय' या व या दोहींतहि तारकासुराच्या वघाकरितां शिव व पार्वती यांजपासून कुमारसंभव ( कुमारोत्पत्ति ) हाच विषय प्रतिपाद्य असल्यामुळे हिमालय, मेना, नारद, मदन, वसंत, रति, कदाचित् बौद्धधर्मी दिवाकरमित्र यासच धर्मबाह्य ह्मणून मातंगदिवाकर असें वैदिकधर्माभिमान्यांनीं ह्मणण्याचें ठेवले असावें, असेंहि वाटतें. कारण, बौद्धांस ते धर्मबाह्य ह्मणत असत. C पूर्वी मातंग या नांवाचा चांडाल होऊन गेला त्याचें नांव सर्वत्र विश्रुत होतें. त्यानें आपल्या शुद्धाचरणानें परम यश मिळविले व त्यामुळे सर्व जातींचे लोक त्याची सेवा करीत असत असा बौद्धग्रंथ सुत्तनिपाठ यांत मजकूर आहे.. १ह्या पद्यांत फारच खुबीदार श्लेष आहेत. ते मार्मिक संस्कृतज्ञ वाचकांच्या लक्षांत येण्यासारखे आहेत. २ बाणानें कुमारसंभवांतील कथानकासच नाटकाचें रूप दिले असावें, असें मलाहि पहिल्या आवृत्तीच्या वेळेस वाटले होतें.