या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५८ ) नंदी, शिव, आणि पार्वती व तिच्या सख्या, हींच पात्र असणे स्वाभाविक असल्यामुळे व दोहींत तोच विषय असल्यामुळे त्या त्या पात्रांची कृति व भाषणें बरीच जमण्याचा संभव आहे. तथापि पार्वतीपरिणयांतील कल्पना, वर्णनें व भाषणें हीं कुमारसंभवाशीं सर्वांशीं जमणारी नसून पुष्कळ ठिकाणी निराळी आहेत. कालिदासाच्या काव्याची तर उत्तमत्वाविषयीं सर्वत्र प्रसिद्धि आहेच; परंतु पार्वतीपरिणयांतील कवितेतहि कांहीं कांहीं कल्पना व प्रसादगुण चांगला साधलेला आहे. मात्र दोहींत कांहीं थोडया वाक्यांत व कोठें पद्यांत बरेंच सादृश्य जमून आलेले आहे खरें, परंतु हा प्रकार एकच विषय असल्यामुळे जमून आला असावा असे वाटतें. जसें - कुमारसंभव. पार्वतीपरिणय. - . द्वन्द्वानि भावं क्रियया विवः । द्वन्द्वानि लौल्यमभजन्त विमोहितानि । संचारिणी पद्धविनी लतेव । संचारणीव वल्ली । कुले प्रसुतिः प्रथमस्य वेधसः | जन्मान्ववाये प्रथमस्य धातुः । पर्यकबंध निविडं विभेद । शिथिलितपर्यंकबंधः । स्त्रीसनिक परिहर्तुमिच्छन् । स्त्रीसन्निकर्षपरिजिहीर्षया । अमंगलाभ्यासरतिं विचित्य तम् । अमङ्गलाचाररतित्रिलोचनः । अद्यमभृत्यवनताङ्गि तवास्मि दासः । तपसा हि कृतोडास्मै दासजनः। शरीरवद्धः प्रथमाश्रमो यथा । गृहीततनुरिव प्रथमाश्रमः । कांही ठिकाणी अशी थोडी सारखीं वाक्यें जमली आहेत, तरी एवढ्याच वरून ह्या कवीच्या सर्व कवित्वावर पाणी सोडणें हें योग्य वाटत नाहीं ! असेच सादृश्य शोधीत बसलें तर इतर ग्रंथांत देखील तें सांपडल्याखेरीज राहत नाहीं. जसें.. - - शाकुंतलांत - 'साहि तत्र भवतः कुलपतेरुच्छ्रसितम् ।' हर्षचरितांत- 'उच्छुसितं सा खलु कुमारस्य' | रघुवंशांत - 'चापलाय प्रचोदितः हर्षचरितांत' करोमि जिव्हाप्लवनचापलम्' | हर्षचरितांत - 'अमीभिः किंवा पुरुषभाषितैः भुजे वीर्य निवसतिन वाचि । उत्तरराम- चरितांत - 'सिद्धं ह्येतद्वाचि वीर्यं द्विजानां वाव्होवर्य यत्तु तत्क्षत्रियाणाम्' कादंबरींत - 'बलवदस्वस्थशरीरा कादम्बरी' । शाकुंतलांत- 'बलवदस्व- स्था शकुंतला' । हर्षचरितांत - 'अभिनवयौवना रम्भावष्टम्भप्रगल्भ- , - -