या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६३ ) आद्यकवि कालिदास, बाण, भवभूति व माघ अशासारख्या थोर कवींच्या काव्यांतून सुद्धां जमून आलेल्या सादृश्यावरून वाचकांच्या ध्यानांत आल्याखेरीज राहिलें नसावें ! ह्या नाटकांत व कुमारसंभवांत एकच संविधानक घेतले असल्यामुळे कांही वाक्यांत शब्दार्थसादृश्य जमून येण्याचा संभव असल्यामुळे तें कोठें कोठें आलें आहे खरें, तरी तेवढ्यानें कवीचें सर्व कवित्व फुकट गेलें अर्से ह्मणणें धाडसाचें होय ! असें कचित् ठिकाणी सादृश्य जमलें असलें तरी इतर गोष्टींचाहि विचार केला पाहिजे. ह्या कवचें कवित्व पुष्कळ ठिकाणीं निराळें असून प्रासादिक असल्यामुळे असले अल्पस्वल्प दोष अगदीच क्षम्य नसावे हें चत्मारिक आहे ! व पार्वतीपरिणयांतील कविता कुमारसंभवांतील कवितेच्या जोडीस वरच्या पायरीवर बसण्यास जरी कोणाच्या मर्ते योग्य नसली, तरी खालच्या पायरींवर बसण्यास तरी ती निःसंशय योग्य आहे, असें नीट लक्ष देऊन पाहणाऱ्या कोणाहि रसिक- जनास वांटल्यावांचून राहणार नाहीं ! 66 आतां " कुमारसंभवांतून अजीबात चोरलेला एकंदर मजकूर " (!) पार्वतीपरिणयांत असल्यामुळे "ग्रंथकाराचा मूर्खपणा व धाडसाची शर्थ ! हीच खालची निव्वळ बाकी!" पदरांत पडते की काय ? याचा विचार करूं. कालिदासाच्या कुमारसंभवांत व बाणाच्या पार्वतीपरिणयांत जो एकं. दर कथानकाचा मजकूर आहे तो शिवपुराणांतूनच घेतला आहे. बाणानें शिवपुराणांतून न घेतां कुमारसंभवांतूनच घेतला आहे, असे कोणी दुराग्र- हानें झटल्यास त्यास ससे सबळ प्रमाण दाखवावें लागेल. नाहींतर नुसता दुराग्रह काय उपयोगी ? असो. आतां " अजीबात मजकूर चोरला " असें झटले आहे, तर दोघांनीहि शिवपुराणांतूनच मजकूर चोरला आहे, यासाठीं कै० चिपळूणकरांनी जी बाकी काढिली आहे ती दोघांच्याहि माथीं मारावी लागेल! याकरितां असें ह्मणणें कांहीं ठीक नाहीं. तर तसे न ह्मणतां दोघांनीहि बाहेरचे कथानक घेऊन काव्यें रचलीं, असें ह्मणणेंच योग्य वाटतें. बाणानें च्या संबंधाने दोपकथन, यांत कोठें कोठें सादृश्य जमतें ! ह्मणून बाणभट्टानें त्या ग्रंथांतून चौर्य केले असे कोणी म्हटले तर उचित होईल काय ? होणार नाहीं. अशीं आणखीद्दि अनेक स्थळे दाखवितां येतील,