या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७० ) उत्सर्पदागरवधूपपरम्पराभिः प्रादुर्भवत्यभिनवो जलदागमोयं । उन्नद्धतोरणमणिप्रभया स्फुरन्त्या संजायते च शतमन्युशरासनश्रीः ॥ विक्षिप्तः सरभसमेष पौरलोकै- विस्फूर्जत्कनकरजः पिशंगदीप्तिः । प्रत्यग्रद्युमणिमयूखजालशोभा- माधत्ते दिशिदिशि कौमः परागः ॥ ह्या तिन्हीं पद्यांत कवीनें विवाहसमारंभाचे चांगले वर्णन केले आहे. विद्युद्वल्लीवितानव्यतिकरसुषमां व्योनि विस्तारयन्त्यः कान्त्या नीलोत्पलानां श्रियमित्र नयनैर्दिङ्मुखे दर्शयन्त्यः | ज्योत्स्नालक्ष्मीं दिवापि स्मितरुचि विसरैर्विष्वगुत्पादत्तन्त्यः सर्वाः स्वर्वारयोपाः समममरगणैरागताः प्रीतये नः । यांत अप्सरांच्या स्वाभाविक सौंदर्याचे वर्णन कवीनें केलें आहे व ते चांगलें साधलें आहे. अंग भूषणनिकरो भूषयतीत्येष लौकिको बादः । अंगानि भूषणानां कामपि सुषमामजीजनंस्तस्याः । यांत पार्वतीच्या अवयवांनींच तिच्या अंगावर घातलेल्या भूषणांस शोभा आणिली. अर्से तिच्या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन केले आहे! हीं थोडीं पद्ये कुमारसंभवाशीं ज्यांचा कांहीं संबंध नाहीं अशी कवीच्या स्वतःस्फूर्तीच्या कवित्वाची साक्ष देण्यास पुरे होतील ! आतां कवीच्या नाटकरचनेंतला कांहीं भाग वाचकांच्या परीक्षेकरितां दाखल केला आहे, त्यांतहि त्याचें चातुर्य, रसिकत्व, व कवित्व ही दिसून येतात. शंकरः पार्वती विलोक्यात्मगतम् । गीतिः एपा विशेषरम्या विवाहवेषेण मोहनेन दृशाम् । प्रतिभाति मानसे मे मदनसहस्राणि कल्पयंतीव ॥ बृहस्पतिः ।भो शंकर ! वध्वा सहास्यां वैदिकायां प्राङ्मुखो वर्तेथाः । शंकरः । पार्वत्या सहोपविशति । आत्मगतम् ।