या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राज्यकर्ता बाबुर ‘बाबुराने अकरा महिन्यांच्या अंतराने राणा संग व इब्राहिमखान लोदी यांस खडे चारून आपले दिल्लीचे तख्त निर्वेध केले. तो बादशहा झाला, त्याबरोबर त्याचा राजदंड फार मोठ्या राज्यावर चालू झाला. त्याची जबाबदारी वाढली. राज्यांतील दंगे-धोपे नाहीसे करून प्रजेला स्थैर्य लाभावें, लोकांचे वित्त व जीवित धोक्यांत नसावे, त्यांचे दैनंदिन कारभार गुण्यागोविंदाने चालावे अशी त्याची उत्कट इच्छा होती. त्यासाठी प्रांताप्रांतांतून दंगेधोपे नाहींसे करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी बाबुराने मोठमोठाले मातबर सरदार लष्करासह पाठविले. राज्यकारभाराची सूत्रे नीट चालावत म्हणून खटपटी सुरू होत्या, त्यामुळे राज्यांतील अराजकें नाहींशी होऊन शांतता निर्माण झाली, प्रजा निर्धास्त होऊन रयतेस चित्तस्वास्थ लाभले. राज्यकारभार नीट मार्गी लावण्याचे उद्योग बाबुराने केले याबद्दल वाद नाहीं; पण एकंदरीने विचार करतां राज्यकारभारधुरंधर म्हणून बाबुराची योग्यता त्याचेनंतर झालेल्या शेरशहा व अकबर यांच्या पुढे फिकी पडते, त्यांच्याजवळ ती वरच्या दर्जाची कुवत नव्हती. आतां हे खरे की त्याला या गोष्टी करण्यास अवसर मिळाला नाही. त्याचे उभे आयुष्य घाड्यावर लढाया