या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-* -* बाबुराचे चारित्र्य १३७ wwwwwwwwwwwwwwwwwww बंडाव्याची चौकशी करून बंडखोरांना शासन करण्याचे काम अलि कुलीहमदानी नांवाच्या अधिका-याकडे सोपविले. त्याच्या हाताखाली या कामासाठी तीन हजार लष्करी स्वारांची एक तुकडी दिली. पहिल्या तडाक्याला एक हजार मुंडाहिर बंडखोर तलवारीनें काटले गेले. कत्तल अंगावर शहारे, आणणारी झाली. मुंडाहिरांच्या मुंडक्यांचे उंच मनोरे उभे करण्यांत आले. एक हजाराच्या सुमारांत बंडखोर मुंडाहिराच्या बायका, पोरे व पुरुष कैद करण्यांत आले. त्या सर्वांची रवानगी दिल्लीला बादशहाकडे झाली. खटल्याची इथंभूत हकीगतही बाबुराकडे पाठविण्यात आली. मुख्य आरोपी मोहन याचीही दिल्लीला रवानगी झाली. हे सर्व आरोपी दिल्लीस येतांच त्यांतील बायकांची वांटणी मोगलांत झाली. इतर आरोपींस योग्य त्या शिक्षा करण्यांत आल्या. मुख्य आरोपी मोहन यास बादशहाच्या आज्ञेने जमिनीत कमरेपर्यंत गाडण्यांत येऊन त्यास बाणाने ठार करण्यांत आले. मुंडाहिर लोकांच्या बंडाचा निचरा अशा प्रकारे करण्यांत आला. बंडखोर रेशमाप्रमाणे मऊ पडल्याने रयत निर्धास्त झाली. बाबुराने केलेल्या कत्तली, अत्याचार व रक्तपात बाबुरासारख्या सुसंस्कृत माणसाला न शोभणाच्या वाटतात पण ते तसे नाहीं. तो त्या कालाचा दोष आहे. बाबुर आपल्या विरुद्ध वागणा-या लोकांवर शस्त्र धरी. पण त्यांनी आपली विरुद्ध चाल सोडून दिली म्हणजे अपराध्यास तो पूर्ण माफी करी. त्याच्या मनात त्यांच्याबद्दल किलमिष राहात नसे. तो त्यांच्याशी साफ दिलाने वागे. वस्त्याच्या वस्त्या, गांवेची गावे, व जिल्हेचे जिल्हे जाळून निवेश करून आपली सत्ता प्रस्थापित करणा-या वंशांतला तो होता. आजही आपण अणु अस्त्राच्या जोरावर अखिल विश्वगोल उध्वस्त करून आपली सत्ता प्रस्थापित करणारी महान् राष्ट्रे आपण पाहतो. त्यांच्यापुढे इसलामीयांनी केलेल्या कत्तली कांहींच नाहींत. राज्यांत उत्तम प्रकारचे दळणवळण बाबुराने निर्माण केले. दिल्लीपासून काबूलपर्यंतचा राजरस्ता त्याने चांगलाच तयार केला. पंधरा पंधरा मैलांच्या