या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ बाबुर ४. इसान दौलत बेगम : ही कोण होती ? हिचे बाबुराच्या जीवनांत स्थान कोणतें होतें ? इसान दौलत बेगमने जमालला कोणते बाणेदार उत्तर दिले ? कोणच्या प्रसंगी दिलें ? शिवाजीच्या जीवनांत जिजाऊचे स्थान कोणते ? ते काम तिला कां करावें लागलें ? तुमच्या आईची एखादी अविस्मरणीय आठवण थोडक्यांत लिहा. ५. बालराजा : राजाचे मुख्य काम कोणते ? एकटाच राजा जर स्वतःच्या मनाप्रमाणे राज्यकारभार करीत असेल तर तिला कसली राज्यपद्धति म्हणतात ? त्या राज्यपद्धतीत दोष कोणचा असू शकतो ? अशा प्रकारच्या राज्यपद्धतीची दोन उदाहरणे सांगा, इतक्या लहान वयांत बाबुरने अष्टप्रधानांवर कशी छाप बसविली ? • सभोवती असलेल्या अनेक लोकांपैक बाबुरानें कोणास दिवाण केलें ? त्यालाच त्याने दिवाण कां निवडले ? त्याने कोणते राजकारण करण्यास सुरुवात केली ? त्याचा मोड कोण व कसा केला ? कोणत्याही भयंकर प्रसंगाला न डगमगतां तोंड देण्याचे सामर्थ्य बाबुरांत कशामुळे आलें ? । राज्यकारभारांत स्वार्थी लोकांचा भरणा असला तर त्यांचे लक्ष राष्ट्राच्या कायद्यावर असत नाहीं; त्यामुळे राष्ट्रहिताकडे दुर्लक्षच होते. पण अशा वेळी जर मध्यवर्ती सत्ता भक्कम असेल तर हा अपघात टळू शकतो. मराठ्यांच्या इतिहासांतील उदाहरणे द्या, ६. समरकंद : समरकंद येथे कोण राज्य करीत होते १ मेहंमद मिझचे घूर्वी तेथे कोण राज्य करीत होते ? त्यांच्या कारकीर्दीसंबंधी तेथील प्रजेचे काय मत होते ? महंमद मिझचे कारकीर्दीत समरकंदमधील लोकांची स्थिति कशी होती त्याचे थोडक्यांत वर्णन करा. सर्वं सत्ता एकाच माणसाच्या हातांत केंद्रीभूत झाली असतां प्रजेला सुख सिळण्याचा जितका संभव तितकाच छळ होण्याचा संभव. पण अशा वेळी राजाचा छळ प्रजेला सहन करावा लागतो, कारण त्याच्याजवळ लष्कराच