या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ बाबुर वर चाल करून येत आहे आणि आतां आपली धडगत नाहीं असे पाहून, दैवावर हवाला ठेवून बाबुर येणा-या संकटाची वाट मोठ्या धैर्याने पहात होता. चालून येणा-या अहंमदाच्या सैन्याने एका नदीच्या पुलावर विजयोन्मादांत घिसाडघाई केली. त्याबरोबर तो पूल पडला आणि बरेचसे सैन्य नर्दीत कोसळले. त्या नदींत भयंकर रेताड होते. त्यांत सैनिक घोड्यांसुद्धां गटंगळ्या खाऊ लागले आणि रेताडांत रुतले, अहंमदखानाचे सैन्य ह्या अपघातामुळे बदल झाले, त्याचा धीर सुटला, हा मोठा अपशकुन झाला असे त्यांना वाटू लागले. कारण चार वर्षांपूर्वी याच ठिकाणी त्याचा असाच विचका झाला होता. या मानासिक दौर्बल्याने त्यास पछाडले तोंच सैन्यांत एका भयंकर रोगाचा उपद्रव सुरू झाला. लोक पटापट मरू लागले.. अहंमद घाबरला आणि बाबुराने तहासाठी दिलेली संधी आपण उगीचच वाया दवडली म्हणून तो पश्चात्ताप करू लागला. पण ती वेळ अजूनही गेली नव्हती.. बाबुर बिचारा वयाने लहान आणि त्याच्यावरील हा प्रसंग पहिलाच होता. तेव्हां अहंमदखानाचा डाव साधला. त्याने जिंकलेली शहरे आपल्या ताब्यात ठेविली आणि बाबुराशी सलोखा करून तो समरकंदकडे वळला. पण तिकडे जात असतांना वाटेतच अहंमदवर मृत्यूनें झडप घातली आणि बाबुराचा एक शत्रु कायमचाच मातीस मिळाला. | अहंमदखानाची ही स्थिति झाली, पण ताशकंदहून निघालेला त्याचा थोरला मामा महंमद जोरांत होता. त्याने कासान आणि अक्षी या दोन शहरांवर चाल केली. तेथे मात्र बाबुराच्या बेग लोकांनी चांगलाच प्रतिकार केला. जोराचे रट्टे बसतांच महंमदखानाचा नक्षा उतरला आणि आपण उगाच या भानगडीत पडलो असे त्यास वाटले. बाबुर व त्याचे बेग लोक, यांचे सामर्थ्य त्याच्या चांगलेच प्रत्ययास आलें ण तो माघारी फिरला महंमदखान हा आरंभशूर होता. त्यास प्रथमग्रासे हा मक्षिकापात होतांच त्याचे गाडे कायमचे थंडावलें.